शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोरिक्षाचालकाच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST

अमरावती : भूखंड खरेदी व्यवहारात इसाराची रक्कम परत न देता मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने एका ऑटोरिक्षाचालकाने १ ...

अमरावती : भूखंड खरेदी व्यवहारात इसाराची रक्कम परत न देता मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने एका ऑटोरिक्षाचालकाने १ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. या प्रकरणातील तीन आरोपींना गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. एक आरोपी अद्यापही फरार असून, त्याचा कसून शोध सुरू आहे.

रूपेश संपतराव निंघोट (५२), सुभाष पुंडलिक दिघेकर (५२) व विजय गुलाबराव येरलेकर (५८, तिघेही रा. संबोधी कॉलनी, रहाटगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील चौथा आरोपी अनूप बारबुद्धे हा अद्याप पसार आहे. रहाटगाव येथील रहिवासी ऑटोरिक्षाचालक राजेश श्यामलाल कडू (५८) यांनी या चौघांसोबत भूखंड खरेदीचा व्यवहार केला होता. त्यासाठी इसार म्हणून राजेश कडू यांनी संबंधित चौघांना ५० हजार रुपये दिले होते. खरेदी करण्यास टाळाटाळ होत असल्याने राजेश कडू यांनी संबंधितांना इसाराची ५० हजारांची रक्कम परत मागितली. यावेळी त्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेचा राजेश कडू यांना मानसिक धक्का बसला. सोमवारी दुपारी २ च्या सुमारास त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील उद्यानामधून पत्नीला मोबाईलवर कॉल केला. संबंधित चौघांच्या त्रासामुळे आपण विष प्राशन करून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी राजेश कडू यांनी एक चिठ्ठीसुद्धा लिहून ठेवली. इसाराची रक्कम परत दिली नाही, शिवाय मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने संबंधित चौघांमुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले. याप्रकरणी मृत राजेश कडू यांच्या पत्नीने रात्री गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर मंगळवारी या प्रकरणातील तिघांना अटक झाली. अनूप बारबुद्धेचा शोध सुरू आहे.