शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगाव येथील तिघांना तीन वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST

परतवाडा/ अंजनगाव सुर्जी : गावागावांत फिरून भोळ्या नागरिकांना इन्कम टॅक्स ऑफिसकडून कर्ज मिळवून देण्याचे आमीष देऊन फसवणूक करणाऱ्या ...

परतवाडा/ अंजनगाव सुर्जी : गावागावांत फिरून भोळ्या नागरिकांना इन्कम टॅक्स ऑफिसकडून कर्ज मिळवून देण्याचे आमीष देऊन फसवणूक करणाऱ्या अंजनगाव सुर्जी येथील तिघांना तीन वर्षांचा कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

अचलपूर न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक ३ एस. टी. सहारे यांच्या न्यायालयाने शनिवारी हा निर्णय दिला. हे फसवणूक प्रकरण ११ वर्षे चालले. योगेश सुरेश गोतमारे व सुरेश कृष्णराव गोतमारे (रा काठीपुरा, अंजनगाव सुर्जी तसेच शिंदी बुद्रुक येथील मो. अफसर मो. सादिक असे न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत.

या तिघांनी अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. गावातील शंभरपेक्षा अधिक लोकांकडून ५० हजार रुपये कर्ज मिळवून देतो, असे सांगून फसवणूक केली होती. या भामट्यांनी पॅनकार्डचे दोनशे रुपये व इन्कम टॅक्स रिटर्नचे २,५०० असे एकूण २७०० रुपये प्रत्येकाकडून फसवणूक करून लुटले होते. पॅनकार्ड दिल्याने अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, त्यांना कर्ज मिळाले नाही. अंजनगाव येथे गोतमारे याच्या घरी अनेकदा चकरा मारल्या. आमचे पैसे परत द्या, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यांचे पैसे या गोतमारेने वापस केले नाही. दरम्यान, पथ्रोट पोलिसांत सुनील उत्तमराव रोडे यांच्यासह ३१ जणांनी मिळून १८ जून २०१० रोजी फिर्याद दिली. त्यावरून भादंविचे कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश व सुरेश गोतमारे यांना त्यांच्या काठीपुरा येथील निवासस्थानी जाऊन अटक केली. मोहम्मद अफसर पसार झाला होता. तत्कालीन ठाणेदार हिवाळे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल अशोक पवार यांनी या प्रकरणाचा तपास करून अचलपूर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. यात अनेक साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील चक्रधर हाडोळे यांनी युक्तिवाद केला. सर्व साक्षीदार तपासल्यानंतर या प्रकरणात वरील तिन्ही आरोपींना दोषी ठरवून तिघांनाही तीन वर्षे शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आरोपी पक्षातर्फे अ‍ॅड. खोजरे यांनी काम पाहिले.