शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर पोलिसांच्या डोळ्यांदेखत गस्तीवरील ‘पिवळ्या हत्ती’वरून चोर निघाले सोने लुटायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 05:00 IST

अचलपूर शहरातील देवडी परिसरातील सराफा ओळीतील प्रकाश चेडे ज्वेलर्समधील सोने-चांदी लुटण्याकरिता २० डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर, दीड वाजतादरम्यान तीन अज्ञात दरोडेखोर मालवाहू गाडीतून पोहोचले होते. या वाहनाला सर्वत्र छोटा हत्ती संबोधले जाते. पोलीस जागे असताना हा हत्ती चावल मंडी मार्गे अचलपूर शहरात दाखल झाला. त्यादरम्यान मार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी पोलीस करीत होते. पण, चोरट्यांचे हे वाहन रिकामे होते. पोलिसांच्या डोळ्यांदेखत ते पुढे निघाले.

अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : पोलीस जागे असताना ‘पिवळ्या हत्ती’वरून अचलपूरमध्ये सोने लुटायला तीन चोर दाखल झाले होते. यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण, दरोड्याच्या अयशस्वी प्रयत्नामागील एक बाजू हीदेखील आहे. अचलपूर शहरातील देवडी परिसरातील सराफा ओळीतील प्रकाश चेडे ज्वेलर्समधील सोने-चांदी लुटण्याकरिता २० डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर, दीड वाजतादरम्यान तीन अज्ञात दरोडेखोर मालवाहू गाडीतून पोहोचले होते. या वाहनाला सर्वत्र छोटा हत्ती संबोधले जाते. पोलीस जागे असताना हा हत्ती चावल मंडी मार्गे अचलपूर शहरात दाखल झाला. त्यादरम्यान मार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी पोलीस करीत होते. पण, चोरट्यांचे हे वाहन रिकामे होते. पोलिसांच्या डोळ्यांदेखत ते पुढे निघाले. हा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये कैद झाला आहे.घटना माहीत होताच सतर्क झालेले पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. गस्तीवरील पोलिसांचे वाहनही त्या ठिकाणी पोहोचले. पण, चोरटे घटनास्थळावरून आपला पिवळा हत्ती घेऊन पसार झाले. ते यशस्वी झाले असते, तर राज्यातील हा सर्वात मोठा दरोडा ठरला असता, अशी चर्चा यानिमित्ताने होत आहे. हे तीनही दरोडेखोर गॅस कटर, गॅस सिलिंडरसह पूर्ण तयारीनिशी पोहोचले होते. अशा तयारीसह दाखल होणारे ते पहिलेच चोरटे ठरले. वेळ न दवडता पोलिसांनी तो हत्ती पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या हाती ते वाहन लागले नाही. सोन-चांदी लुटायला अचलपुरात दाखल झालेल्या दरोडेखोरांची पाठमोरी आकृती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्यांचा चेहरा यात स्पष्ट होत नाही. दरम्यान अचलपुर पोलिसांनी एकूण पाच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले तरी त्यांची ओळख पटलेली नाही. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा स्वतंत्रपणे करीत आहे. हे दरोडेखोर विदर्भाबाहेरील असल्याचा प्राथमिक अंदाज सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांचा सुगावा लागला असून लवकरच त्यांना गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिस