दोन दिवस रेकी केली अन् मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना वाहनाखाली चिरडले; व्यावसायिक वादातून हत्याकांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 18:47 IST2026-01-22T18:31:32+5:302026-01-22T18:47:01+5:30

Amravati : व्यावसायिक वादातून चांदूर बाजार येथे झालेल्या नीलेश बदुकले यांच्या निघृण हत्याकांडात तब्बल दोन दिवस रेकी केल्यानंतर त्यांना वाहनाखाली चिरडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

they noticed his movements for two days and was crushed under a vehicle while going for a morning walk; Murder due to a professional dispute | दोन दिवस रेकी केली अन् मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना वाहनाखाली चिरडले; व्यावसायिक वादातून हत्याकांड

they noticed his movements for two days and was crushed under a vehicle while going for a morning walk; Murder due to a professional dispute

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार:
व्यावसायिक वादातून चांदूर बाजार येथे झालेल्या नीलेश बदुकले यांच्या निघृण हत्याकांडात तब्बल दोन दिवस रेकी केल्यानंतर त्यांना वाहनाखाली चिरडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आल्याने एकूण आरोपींची संख्या आता तीन झाली आहे.

मृत नीलेश सुरेश बदुकले (४२, रा. टोम्पेनगर, चांदूर बाजार) हे रेती व मुरुमाचे नामवंत होते. व्यावसायिक काही काळापूर्वीच ते कुटुंबासह चांदूर बाजार येथे वास्तव्यास आले होते. १९ जानेवारी रोजी सकाळी ते पत्नीसमवेत चांदूर बाजार - वलगाव मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना, व्यवसायातील वादातून आरोपी अजय भुजंगराव लंगोटे याने चारचाकी वाहन त्यांच्यावर घालून त्याखाली चिरडले. या भीषण घटनेत नीलेश बदुकले यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली.

घटनेनंतर संतप्त नागरिक व नातेवाइकांनी चांदूर बाजार पोलिस ठाण्यात मोठी गर्दी करीत हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी वरिष्ठ तातडीने अधिकाऱ्यांना माहिती देत खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी अजय लंगोटे याला अटक केली. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीदरम्यान तपासात या हत्याकांडात आणखी दोन जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. प्रकरणाचा पुढील तपास एसपी विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक जाधव व सहायक पोलिस निरीक्षक उल्हास राठोड करीत आहेत.

चांदूर बाजार तालुक्यातील दोघे ताब्यात

चांदूर बाजार पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक जाधव व सहायक पोलिस निरीक्षक उल्हास राठोड यांनी तत्काळ कारवाई करीत संजय उर्फ गोलू भुजंगराव लंगोटे (वय ४०, रा. ठुगांव पिंपरी) आणि पवन विकास झटाले (वय २३, रा. शिरजगाव बंड) यांना रात्री उशिरा ताब्यात घेतले. या दोघांनी हत्येपूर्वी दोन दिवस नीलेश बदुकले यांची हालचाल, वेळापत्रक व मार्गाची रेकी केल्याची कबुली दिली. त्यामुळे नियोजनबद्ध कट रचून ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले.

Web Title : रेकी के बाद कुचला: चांदूर में व्यावसायिक विवाद में हत्या

Web Summary : चांदूर बाजार में व्यावसायिक विवाद के चलते नीलेश बदुकले को रेकी के बाद कुचल दिया गया। दो और गिरफ्तारियां हुईं, कुल संख्या तीन हो गई। पीड़ित को जानबूझकर निशाना बनाया गया। पुलिस जांच जारी है।

Web Title : Reconnaissance, Then Crushed: Business Dispute Leads to Murder in Chandur

Web Summary : Following reconnaissance, Nilesh Badukle was fatally run over due to a business dispute in Chandur Bazar. Two more arrests were made, bringing the total to three. The victim was deliberately targeted. Police investigation is ongoing.