शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

...तिथे कुणीही केली नाही रंगांची उधळण !

By admin | Updated: March 8, 2015 00:14 IST

संत परशराम महाराजांच्या पदस्पर्शाने पूनीत झालेल्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोदवासीयांनी यंदाही रंगपंचमी उत्सवाला फाटा दिला. यादिवशी येथे कुणीची रंगपंचमी साजरी केली नाही.

अनंत बोबडे येवदासंत परशराम महाराजांच्या पदस्पर्शाने पूनीत झालेल्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोदवासीयांनी यंदाही रंगपंचमी उत्सवाला फाटा दिला. यादिवशी येथे कुणीची रंगपंचमी साजरी केली नाही. भागवत कथायज्ञासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन हे गाव जिल्ह्यातील रंगपंचमी उत्सव न साजरे करणारे गाव ठरले आहे.पिंपळोदवासीयांना अनेक पद्धतीने साक्षात्कार देत असलेले परशराम महाराज होळीच्या दिवशी निघून गेल्याने ६४ वर्षांपासून या गावात होळी व रंगपंचमी आजही खेळली जात नाही. महाराजांनी जाता-जाता पिंपळोदवासीयांना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एकप्रकारचा धडाच दिला. महाराष्ट्रभर एकीकडे होळी व रंगपंचमीला हजारो झाडांची वृक्षतोड आणि होळीनिमित्त पेटविली जाणारी लाकडे व त्यामधून निघणारा विषारी धूर. मौल्यवान पाण्याचा अपव्यय महाराष्ट्रातील अनेक भागांत रंगपंचमीला आढळतो. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजन या रंगपंचमीच्या आनंदात सहभागी होतात. परंतु गत ६४ वर्षांपासून पिंपळोदवासियांनी होळी व रंगोत्सव महाराजांच्या मृत्यूमुळे साजरा करीत नाही. महाराजांच्या सन्मानार्थ घ—तलेला हा निर्णय अर्थात् वाढत्या प्रदूषणावर होणाऱ्या अतोनात खर्चावर एक प्रकारे अंकुशच म्हणावा लागेल. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गावाची मोलाची भूमिका आहे. गावकऱ्यांनी महाराजांच्या पुण्यतिथीदिनानिमित्त यंदाही संगीतमय भागवत ज्ञानयज्ञसप्ताहाचे आयोजन केले होते. यात वाणीभूषण सु.श्री. वैभवीश्री यांच्या ओजस्वी वाणीतून भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक राजेश वाघझाडे यांच्या सहकार्यातून या परिसरातील नागरिकांसाठी भागवत सप्ताह, आर्ट आॅफ लिव्हींग शिबिर तसेच सुदर्शन क्रीया, ध्यान साधना, आत्मशांती, कार्यसिध्दी, ताणतणाव यापासून मुक्ती मिळविण्यासाठी असे कार्यक्रम घेण्यात आले.