महिलांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 21:09 IST2020-09-09T21:08:40+5:302020-09-09T21:09:08+5:30
महिलांच्या सुरक्षिततेला प्राधन्य दिले जाणार असून त्या मुद्यावर तडजोड ना केली जाईल, ना खपवून घेतली जाईल, असा निर्धार शहर पोलीस दलाच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी व्यक्त केला.

महिलांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महिलांच्या सुरक्षिततेला प्राधन्य दिले जाणार असून त्या मुद्यावर तडजोड ना केली जाईल, ना खपवून घेतली जाईल, असा निर्धार शहर पोलीस दलाच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी व्यक्त केला. त्यांनी आज पोलीस आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारली.
शहरातील हिस्ट्रिशीटर आणि अवैध व्यावसायिकांना तडीपार केले जाईल. शहरातील 'क्राईम रेट' कमी करण्याच्या मुद्यावर निरंतरपणे काम केले जाईल. पोलीस दलातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले जातील. सर्वसामान्यांसाठीच्या आणि पारदर्शक पोलिसिंगवर माझा भर असेन. लवकरच नागरिकांसाठी माझा थेट संपर्क क्रमांक जाहीर केला जाईल, अशी माहिती आरती सिंह यांनी दिली. पत्रकारांशी अनौपचारिक भेटीदरम्यान त्या बोलत होत्या.