शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

- तर भाजप जेलभरो आंदाेलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST

राज्य सरकार १३ नोव्हेंबरच्या घटनेला जास्त फोकस करीत आहे. मात्र, १२ नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याकांनी शहरात जी ‘ॲक्शन’ केली, त्याची १३ नोव्हेंबर रोजी ‘रिॲक्शन’ होती. भाजपने बंदचे आवाहन केले होते, हे आम्ही कबूल करीत आहे.  कारण हिंदू असुरक्षित असेल तर भाजप त्यांच्या सुरक्षेसाठी कधीही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. हिंदूत्ववादी संघटनांना दोषी ठरविले जात आहे. बळजबरीने अटकसत्र सुरू आहे. मात्र, हीच तत्परता दोषी अल्पसंख्याकांच्या अटकेसाठी दाखविली जात नाही, असा आरोप त्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात १२ व १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या दोन गटातील हिंसाचाराला केवळ भाजप व  हिंदू संघटनांना टार्गेट केले जात आहे. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या इशाऱ्यावर पोलीस प्रशासन भाजपचे नेते, कार्यकर्त्यांवर एकाच घटनेसाठी चार ते पाच ठाण्यात गुन्हे दाखल करीत आहेत. काही जणांना बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार थांबला नाही तर, भाजप जेलभरो आंदोलन करणार, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला. भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दंगलपीडितांची भेट घेतली. संवेदनशील भागात दौरा केला. त्यानंतर  त्यांनी पत्रपरिषदेला संबोधित केले.राज्य सरकार १३ नोव्हेंबरच्या घटनेला जास्त फोकस करीत आहे. मात्र, १२ नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याकांनी शहरात जी ‘ॲक्शन’ केली, त्याची १३ नोव्हेंबर रोजी ‘रिॲक्शन’ होती. भाजपने बंदचे आवाहन केले होते, हे आम्ही कबूल करीत आहे.  कारण हिंदू असुरक्षित असेल तर भाजप त्यांच्या सुरक्षेसाठी कधीही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. हिंदूत्ववादी संघटनांना दोषी ठरविले जात आहे. बळजबरीने अटकसत्र सुरू आहे. मात्र, हीच तत्परता दोषी अल्पसंख्याकांच्या अटकेसाठी दाखविली जात नाही, असा आरोप त्यांनी केला. भाजपवर दडपशाही, एकतर्फी कारवाया थांबविल्या नाहीत, तर भाजप जेलभरो आंदोलन करून राज्य सरकारचे जेलमध्ये पाठविण्याचे मनसुबे आम्ही स्वत: पूर्ण करू, असा टोलादेखील त्यांनी लगावला. पत्रपरिषदेला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अनिल बोंडे, महापौर चेतन गावंडे, महापालिका गटनेता तुषार भारतीय, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, उपमहापौर कुसूम साहू शहराध्यक्ष किरण पातुरकर, रविराज देशमुख, जयंत डेहनकर, ॲड.  प्रशांत देशपांडे, प्रवीण वैश्य, सुनील साहू आदी उपस्थित होते. 

गृहमंत्र्यांना भेटून वास्तव कळवू१२ व १३ नोव्हेंबर रोजीच्या घटनेचे समर्थन करू शकत नाही. मात्र, १२ तारखेची घटना ‘डिलिट’ करता येत नाही. पोलीस प्रशासन हे कुणाच्या इशाराऱ्यावर कारवाई करीत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मसानगंज भागात दौरा केला असता, एक महिला भेटली आणि त्यांनी मोटरसायकल घरात लावत असताना त्यांच्या मुलाला पोलीस घेऊन गेले. एवढेच नव्हे तर भादंविच्या ३०७ कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. भाजप व अन्य हिंदू संघटनांशी संबंधित असलेल्यांना त्रास दिला जात आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार असून, अमरावती येथील वस्तुस्थिती कळविणार असल्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सांगितले.

पालकमंत्री १२ नोव्हेंबरच्या घटनेवर का बोलत नाही?अमरावती शहरात विनापरवानगी १२ नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याकांच्या माेर्चाला परवानगी होती का?, राज्यात एकाच वेळी मालेगाव, नांदेड  व अमरावती शहरात मोर्चा काढण्यात आला. हे पूर्वनियोजित षडयंत्र होते का?, यामाध्यमातून राज्य किंवा देशात दंगे भडकविण्याचे कटकारस्थान होते का? याबाबत पालकमंत्री यशोमती ठाकूर काहीही बोलत नाही, असा सवाल विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा