शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्य महामार्गावरील वन विभागाचा बहिरम नाका अंधारात; सीसीटीव्ही कॅमेरे बनले शो-पीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:01 IST

आंतरराज्य महामार्गावरील वन विभागाचा हा बहिरम नाका महत्त्वपूर्ण असून, या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये वनरक्षक आपल्या ड्युटीवर असतात. सागवान लाकडासह तेंदूपत्ता व अन्य वन उपजची मोठ्या प्रमाणात या नाक्यावरून वाहतूक होते. बदली टिपी पासही याच नाक्यावर बदलविल्या जाते. अवैध सागवान लाकडाची  तस्करीही या नाक्यावरूनच होते. अवैध गुटखा व बनावट दारूचीही याच नाक्यावरून वाहतूक होते.

अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : बैतुल-परतवाडा आंतरराज्य महामार्गावरील वन विभागाचा  बहिरम नाका मागील १० दिवसांपासून अंधारात आहे. थकीत वीज बिलापोटी वीज वितरण कंपनीने येथील विद्युत पुरवठा खंडित केला आहे. ३ हजार रुपयाचे वीज बिल भरायला परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे पैसे नसल्यामुळे ही नामुष्की ओढवली आहे. यापूर्वीही बहिरम नाक्याचा वीज पुरवठा जवळपास दोन ते अडीच महिने वीज वितरण कंपनीकडून खंडित करण्यात आला होता.आंतरराज्य महामार्गावरील वन विभागाचा हा बहिरम नाका महत्त्वपूर्ण असून, या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये वनरक्षक आपल्या ड्युटीवर असतात. सागवान लाकडासह तेंदूपत्ता व अन्य वन उपजची मोठ्या प्रमाणात या नाक्यावरून वाहतूक होते. बदली टिपी पासही याच नाक्यावर बदलविल्या जाते. अवैध सागवान लाकडाची  तस्करीही या नाक्यावरूनच होते. अवैध गुटखा व बनावट दारूचीही याच नाक्यावरून वाहतूक होते.          अशा या नाक्यावर अमरावती प्रादेशिक वन विभागाकडून परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यक्षेत्र अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत; पण मागील काही दिवसांपासून नाक्यावरील वीज पुरवठा खंडित असल्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. ते केवळ शोपीस ठरले आहेत.

महिला राज बहिरम नाक्यावर आठ तासांच्या तीन शिफ्टमध्ये तीन वनरक्षक कार्यरत असतात. आज या नाक्यावर तीनही शिफ्टमध्ये महिला वनरक्षक आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचा सामना त्यांना करावा लागत आहे. बरेचदा या नाक्यावर वन कर्मचारी बघायला मिळत नाहीत. अनेकदा केवळ वनमजूर या नाक्यावरील कामकाज सांभाळताना दिसतात.

वास्तूंची पडझड बहिरम नाक्याच्या अनुषंगाने चेक पोस्ट लगत लाखो रुपये खर्च करून वन विभागाने शासकीय निवासस्थान व कार्यालय काही वर्षांपूर्वी उभारले; पण या  वास्तूचा वन विभागाला चक्क विसर पडला. या वास्तूच्या खिडक्यांची तावदाने फुटली. वास्तूची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. पाण्याच्या व्यवस्थेकरिता उभारल्या गेलेला हॅण्डपंपही दुर्लक्षिल्या गेला.

सोयी-सुविधांचा अभाव : या नाक्यावर आवश्यक त्या सोयी-सुविधांचा अभाव आहे.  वन कर्मचाऱ्यांकरिता त्या ठिकाणी राहण्यास योग्य असे कुठलेही शासकीय निवासस्थान नाही. विश्रामाकरिता विश्रामगृहही नाही.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग