धारणी -परतवाडा मार्गावर भीषण अपघात; २ महिला मजुरांचा जागीच मृत्यू, ६ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:34 IST2026-03-31T15:33:37+5:302026-03-31T15:34:24+5:30

Amravati : धारणी-परतवाडा मार्गावर मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून ६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

Terrible accident on Dharani-Paratwada road; 2 female laborers died on the spot, 6 injured | धारणी -परतवाडा मार्गावर भीषण अपघात; २ महिला मजुरांचा जागीच मृत्यू, ६ जखमी

Terrible accident on Dharani-Paratwada road; 2 female laborers died on the spot, 6 injured

अमरावती: धारणी-परतवाडा मार्गावर मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.  या अपघातात दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून ६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडल्याचे वृत्त हाती आले आहे. लवादा गावाजवळील अलई नदीच्या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप थेट दरीत कोसळली.

​मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व मजूर टरबूज आणि खरबूज तोडणीच्या कामासाठी जात होते. मृत पावलेल्यांमध्ये एक महिला आणि एका युवतीचा समावेश असून, त्या दोन्ही एकाच गावातील रहिवासी होत्या. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

​जखमींना तातडीने धारणी उपजिल्हा  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, ओव्हरलोडिंग किंवा तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Web Title : धारणी-परतवाड़ा मार्ग पर भीषण दुर्घटना: दो की मौत, छह घायल

Web Summary : धारणी-परतवाड़ा मार्ग पर एक पिकअप वैन दुर्घटना में दो महिला मजदूरों की मौत हो गई और छह घायल हो गए। तरबूज की कटाई के लिए मजदूरों को ले जा रही वैन, चालक के नियंत्रण खो देने के बाद लवादा गांव के पास एक घाटी में गिर गई। ओवरलोडिंग कारण हो सकता है।

Web Title : Tragic Accident on Dharni-Paratwada Road: Two Dead, Six Injured

Web Summary : A pickup van accident on Dharni-Paratwada road killed two female laborers and injured six. The van, carrying laborers for watermelon harvesting, fell into a valley near Lawada village after the driver lost control. Overloading may be the cause.