जळगावजवळ भीषण अपघात; मेळघाटच्या आमदार पुत्रासह तिघेही बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 19:48 IST2020-05-29T19:47:57+5:302020-05-29T19:48:26+5:30
धारणीहून मुंबईकडे जाताना वाटेत जळगावनजीक कार अचानक पुलाखाली कोसळली. गुरुवारी पहाटे ५ वाजता सदर घटना घडली. यात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचे पुत्र रोहित पटेल, स्वीय सहायक व चालक थोडक्यात बचावले.

जळगावजवळ भीषण अपघात; मेळघाटच्या आमदार पुत्रासह तिघेही बचावले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धारणीहून मुंबईकडे जाताना वाटेत जळगावनजीक कार अचानक पुलाखाली कोसळली. गुरुवारी पहाटे ५ वाजता सदर घटना घडली. यात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचे पुत्र रोहित पटेल, स्वीय सहायक व चालक थोडक्यात बचावले.
धारणी पंचायत समितीचे माजी सभापती रोहित पटेल, आमदाराचे स्वीय सहायक हुकुमचंद मालवीय हे चारचाकी वाहनाने चालकासह मंत्रालयीन कामासाठी मुंबईकडे बुधवारी रात्री निघाले होते. धारणी जळगावमार्गे जात असताना गुरुवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान पारडा गावानजीक ३५ फूट खोल पुलाखाली कार कोसळली. यात कारचा चेंदामेंदा झाला. मात्र, रोहित पटेल यांच्यासह हुकुमचंद मालविय व चालक तिघेही सुखरूप बचावले. घटनेची माहिती मिळताच आमदार राजकुमार पटेल, प्रकाश घाडगे आदींनी घटनास्थळी जाऊन तिघांनाही सुखरूप धारणी येथील घरी परत आणले.