शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रप्रमुखांच्या दहा जागा रिक्त दर्यापुरात शिक्षणाचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 05:01 IST

दर्यापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत १० केंद्रे येतात. यात १२८ शाळांचा समावेश आहे. १० केंद्रप्रमुख असणाऱ्या पंचायत समितीत आता नऊ शिक्षकांकडे अतिरिक्त प्रभार असून ते केंद्रप्रमुखांचा कारभार पाहत आहेत. यापैकी एका शिक्षकाकडे सामदा व रामतीर्थ असा दोन ठिकाणचा भार आहे. १० केद्रांमध्ये थिलोरी, इटकी, शिंगणापूर, चंडिकापूर, सांगवा, दर्यापूर, येवदा, सामदा, रामतीर्थ, वरूड कु. यांसारखी मोठी गावे आहेत. येथील शिक्षण विभाग आजवर प्रभारीच राहिल्याचे वास्तव आहे. 

धनंजय धांडे लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : स्थानिक पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गट शिक्षणाधिकाऱ्यासह अनेक पद रिक्त आहेत. प्रभारीराज असल्याने या महत्त्वाच्या विभागाचे तीनतेरा वाजल्याचे वास्तव चित्र आहे. परिणामी, कार्यरत कर्मचाऱ्यांना कामाचा भार वाहून न्यावा लागत आहे. केंद्रप्रमुखांच्या दहाही जागा रिक्त असून नऊ शिक्षक १० केंद्रांचा गाडा हाकत आहेत.दर्यापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत १० केंद्रे येतात. यात १२८ शाळांचा समावेश आहे. १० केंद्रप्रमुख असणाऱ्या पंचायत समितीत आता नऊ शिक्षकांकडे अतिरिक्त प्रभार असून ते केंद्रप्रमुखांचा कारभार पाहत आहेत. यापैकी एका शिक्षकाकडे सामदा व रामतीर्थ असा दोन ठिकाणचा भार आहे. १० केद्रांमध्ये थिलोरी, इटकी, शिंगणापूर, चंडिकापूर, सांगवा, दर्यापूर, येवदा, सामदा, रामतीर्थ, वरूड कु. यांसारखी मोठी गावे आहेत. येथील शिक्षण विभाग आजवर प्रभारीच राहिल्याचे वास्तव आहे. मागील वर्षभरापासून भातकुली येथील विस्तार अधिकारी वीरेंद्र तराळ हे दर्यापूर पंचायत समितीत प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यामुळे शिक्षण विभागात कामकाजावर परिणाम होत आहे.  जिल्हा परिषदेच्या शाळा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शासन स्तरावरून उपाययोजना केल्या जात असल्या तरी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची पदे भरल्याशिवाय यात बदल होणे शक्य नाही. याला शासनाचे धोरणच कारणीभूत असल्याचे वर्तुळातून बोलले जात आहे.

एक विस्तार अधिकाऱ्याकडे १२८ शाळा दर्यापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात विस्तार अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक विस्तार अधिकारी कार्यरत असून दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे  एक विस्तार अधिकाऱ्याकडे १० केंद्रे व १२८ शाळा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीत शिक्षण विभागाला संपूर्णत: रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.

शिक्षण विभागात केंद्रप्रमुखांसह अनेक पदे रिक्तच आहेत. महत्त्वाचीच पदे रिक्त असल्याने साहजिकच माझ्यासह इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार येत आहे. मात्र, कामकाज सुरळीतपणे सुरू आहे. रिक्त असलेली पदे लवकर भरावीत म्हणून वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. - वीरेंद्र तराळ, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, दर्यापूर पं. स.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र