मालखेड येथे महाराजस्व अभियानांतर्गत ‘तहसील आपल्या दारी’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST2021-07-21T04:11:12+5:302021-07-21T04:11:12+5:30
तहसील च्या कागदोपत्री समस्यांचे जागेवरच समाधान मालखेड, लालखेड सरपंचा यांची उपस्थिती चांदूर रेल्वे :- जिल्हाधिकारी अमरावती यांच्या निर्देशान्वये ...

मालखेड येथे महाराजस्व अभियानांतर्गत ‘तहसील आपल्या दारी’ उपक्रम
तहसील च्या कागदोपत्री समस्यांचे जागेवरच समाधान
मालखेड, लालखेड सरपंचा यांची उपस्थिती
चांदूर रेल्वे :- जिल्हाधिकारी अमरावती यांच्या निर्देशान्वये तालुक्यातील मालखेड रेल्वे येथे महाराजस्व अभियानांतर्गत ‘तहसील आपल्या दारी’ हा उपक्रम महसूल विभागाच्या वतीने तहसिलदार राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार एस ए अनासुने यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालखेड येथे मंगळवारी राबविण्यात आला असुन अनेकांच्या समस्यांचे जागेवरच समाधान करण्यात आले. यावेळी मालखेड च्या सरपंचा श्रीमती लताताई डोक,उपसरपंच गोपाल अळणे,लालखेड च्या सरपंचा मुक्ताताई संतोष राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कार्यालयातील गर्दी टळावी व शासकीय योजनांची अंमलबजावणी विनाखंड व्हावी यासाठी ‘तहसील आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे अनेक नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच समाधान होत असून, शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच सदर उपक्रम तालुक्यातील मालखेड येथे राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालखेड ग्रा. पं. च्या सरपंचा लताताई डोक ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसिलदार एस. ए. अनासुने, लालखेड च्या सरपंच मुक्ताताई राठोड आदींची मंचावर उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे रवि कलाने व आभार प्रदर्शन सुषमा ताई चौकडे यांनी केले. यावेळी चांदूर रेल्वेच्या महसुल विभागाचे मंडळ अधिकारी अमोल देशमुख, तलाठी प्रफुल्ल गेडाम, कृषी सहाययक पवनसिंह राठोड, पुरवठा विभागातील राणी आंबेकर कवठा कडू येथील तलाठी चेतन तामगाडगे,धानोरा मोगल येथील तलाठी प्रफुल्ल खंडार भिलटेक प्रफुल्ल नांदने
संजय गांधी विभागातील शिवदास चव्हाण या चमुंनी महसूल, पुरवठा विभाग, संजय गांधी, श्रावनबाळ योजना, शेती पांदन रस्ते, अंत्योदय योजना यासंबंधी समस्यांचे निराकरण केले. यावेळी आदींची उपस्थिती होती.
(फोटो ओळ - चांदूर रेल्वे - उद्घाटनाप्रसंगी मंचावर उपस्थित लालखेड,मालखेड येथील सरपंचा व नायब तहसीलदार एस ए अनासुने व त्यांची चमू समस्यांचे निराकरण करतांना)
200721\img-20210720-wa0028.jpg
photo