शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दिन ‘काळा दिन’ म्हणून पाळला

By admin | Updated: September 6, 2016 00:12 IST

उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालये आणि शिक्षकांचे प्रश्न, समस्या प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमिवर ....

धरणे आंदोलन : शिक्षक, शाळांचे विविध प्रश्न, समस्या कायमअमरावती : उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालये आणि शिक्षकांचे प्रश्न, समस्या प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमिवर शासनाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्यावतीने सोमवारी शिक्षक दिनी ‘काळा दिन’ म्हणून पाळला गेला. शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने एक दिवसीय धरणे आंदोलन करुन शिक्षकांनी शिक्षक दिन ‘काळा दिन’ म्हणून पाळला. शासनाने प्राथमिक व माध्यमिक शाळांना २० टक्के अनुदान देण्याचे मान्य केले. परंतु त्याच बरोबर गत १५ ते १६ वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन पात्र प्रस्ताव गत दोन महिन्यांपासून शासनाने यादी घोषित केलीे नाही. या तरतुदीचा विषय शासनाने विचारधीन घेतला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील आझाद मैदान तर शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे. एकिकडे प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा सुरू असताना विनाअनुदानित शाळा, उच्च माध्यमिक शाळांचे अनुदान न देता त्यांना ताटकळत ठेवण्याचे धोरण शासनाने आखले आहे. शासनाच्या या धोरणामुळे अनेक शिक्षकांना मृत्यूच्या दारी जावे लागत असताना राज्यात २२ हजार ५०० शिक्षक रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे अनुदान पात्र यादी मान्य करुन १०० टक्के आर्थिक तरतूद जाहीर करण्यात यावी, उर्वरित उच्च माध्यामिक शाळांचे मुल्यांकनाचे आॅफलाईन मुल्यांकन आदेश देण्यात यावे, सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यतेचे आदेश देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शेखर भोयर, संजय खोडके, सुलभा खोडके संतोष वाघ, गजानन वाघ, संतोष गावंडे, गाजी जहरोश, प्रशांत कंवर, पुरुषोत्तम येरेकार आदी उपस्थित होते.