शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन शिक्षिकेची आत्महत्या

By admin | Updated: February 27, 2015 00:17 IST

चिखलदरा तालुक्यातील हत्तीघाट येथील जि.प. पूर्व माध्यमिक शाळेवर कार्यरत शिक्षिकेने गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान राहत्या घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

अचलपूर : चिखलदरा तालुक्यातील हत्तीघाट येथील जि.प. पूर्व माध्यमिक शाळेवर कार्यरत शिक्षिकेने गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान राहत्या घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सुशीला प्रेमलाल भिलावेकर (३७) रा. ऋषीराज कॉलनी कांडली असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षिकेचे नाव आहे. त्या चिखलदरा पं.स. अंतर्गत येणाऱ्या हत्तीघाट येथील शाळेवर कार्यरत होत्या. पती प्रेमलाल बाबू भिलावेकर हेसुध्दा डोमा येथील शाळेवर शिक्षक आहेत. ते दोन दिवसांपासून शालेय कामासाठी परतवाडा (कांडली) येथे घरी आले होते. पत्नी सुशीला आठ वर्षीय मुलगी व भाची सोबत राहत होती. नेहमीप्रमाणे सर्व व्यवस्थित असताना मध्यरात्री मृत शिक्षिका सुशीला उठल्या लघुशंकेसाठी गेल्या. २.३० वाजतादरम्यान आग आल्याने त्यांचे पती जागे झाले. पत्नीला पाहण्यास गेले असता त्या आढळल्या नाही. बाहेरुन बंद करण्यात आले होते. तोच प्रकार झोपलेल्या खोलीचा होता. दरोडेखोर  घुसल्याची शंकाघरात बंद असलेले पती प्रेमलाल भिलावेकर यांनी भ्रमणध्वनीवर शेजारी राहणारे जावई महादेव कास्देकर यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी परतवाडा पोलिसांना तत्काळ कळविले. घरात चोर घुसले असावे, असा संशय असताना घटणास्थळी दार उघडताच धक्कादायक चित्र होते. पंख्याला नायलॉन दोरीने सुशीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.कारण अज्ञातचपती-पत्नीमध्ये १५ वर्षांच्या वैवाहिक जीवनात कुठल्याच प्रकारचा वाद पहावयास मिळाले नसल्याचे खुद्द भिलावेकर यांच्या सासऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सदर प्रकरणाचा तपास केला जाणार असून प्रमथदर्शी ठोस असे काही पुरावे आढळून आले नसल्याचे परतवाड्याचे ठाणेदार गिरीश बोबडे यांनी सांगितले. केवलराम काळे, पं.स. सभापती दयाराम काळे, शिक्षकांनी भेट देऊन सांत्वना केली.