शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

विद्यार्थ्याला एका नोंदणीवर मिळाले दोन आधार कार्ड, दोन्हींचे लिंक नाही, शासनाच्या योजनांपासून वंचित 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 6:09 PM

मोर्शी तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावरील अंबाडा येथे संचित वासुदेव वानखडे या सहा वर्षाच्या मुलाच्या घरी त्याचे दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे आधार कार्ड घरी पोहोचले आहेत

गोपाल डाहाकेमोर्शी (अमरावती) : तालुक्यातील एका विद्यार्थ्याला दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे आधार कार्ड घरपोच मिळाले आहेत. आधारसाठी आवश्यक असणा-या सर्व गोष्टी युनिक असताना, हा प्रकार उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मोर्शी तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावरील अंबाडा येथे संचित वासुदेव वानखडे या सहा वर्षाच्या मुलाच्या घरी त्याचे दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे आधार कार्ड घरी पोहोचले आहेत. पहिल्या आधारवर ५७१७ ६०३४ ७२९१ हा क्रमांक आहे, तर दुस-या आधारवर ७६५० ३८२६ २०६९ असा क्रमांक नमूद आहे. यामुळे शासकीय कामात कोणते आधार कार्ड वापरावे, असा प्रश्न त्याच्या पालकांना पडला आहे. 

नोंदणी एकदाचसंचितची ३१ |गस्ट २०१६ रोजी मोर्शी येथील आठवडी बाजार परिसरातील सेतु केंद्रात आधार कार्डसाठी नोंदणी केली होती. बोटांचे ठसे, डोळ्यांचा रेटिना व अन्य आवश्यक माहिती केवळ एकदाच नोंदविण्यात आली. यावेळी त्याच्यासोबत आई रेखा व वडील वासुदेव होते. 

नामांकन दोनदाआधारसाठी नोंदणी करतेवेळी दोनवेळा नामांकन प्राप्त झाले. पहिले नामांकन क्रमांक २०३४/३०५२३/००८६८, तर दुसरे २०३४/३०५२३/००८६७ असे होते. आधार कार्ड एकच मिळेल, असे सांगितले गेल्याने संचिंतच्या पालकांनी फारसे मनावर घेतले नाही. यानंतर मुलाचे दोन आधार घरी आले.  स्कॉलरशिप, बँक खाते नाहीसंचित अंबाडा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गाचा विद्यार्थी आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यात आला. मात्र, त्याचे दोन्ही आधार क्रमांक बायोमेट्रिक पद्धतीने लिंक होत नाहीत. गरजेचे असणारे बँक खातेदेखील ऊघडू शकले नाही. 

एनआयसीने ठरवून दिलेल्या आधार केंद्राला मदत करणे, जास्तीत जास्त आधार कार्ड बनविणे व देखरेख ठेवणे ही कामे आमच्याकडे आहेत. तांत्रिकदृष्ट्या बायोमेट्रिकबद्दल माहिती आमच्याकडे नाही; जिल्हास्तरावरून ती माहिती मिळू शकेल. - अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार, मोर्शी 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड