शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज न भरता विद्यार्थी परीक्षेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

विद्यापीठात यावर्षीपासून बीए, बीकॉम, बीएस्सी शाखेच्या प्रथम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांची ऑनलाइन नामांकन माहिती सुरू केली आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती विद्यापीठात पाठविली. परंतु, परीक्षेच्या ऑनलाइन कामकाजाची जबाबदारी असलेल्या लर्निंग स्पायरल कंपनीने ही ऑनलाइन नामांकन यादी परीक्षार्थींची नावे म्हणून स्वीकारली आणि ऑनलाइन प्रवेशपत्र पाठविले.

ठळक मुद्देविद्यापीठात ऑनलाईन गोंधळ : नामांकनाची यादी ग्राह्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हिवाळी २०१९ परीक्षेचे फॉर्म न भरता विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात बहुतांश विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गुणपत्रिकासुद्धा काढण्यात आल्या आहेत. मात्र, ही बाब महाविद्यालयांच्या निदर्शनास आल्यानंतर आता विद्यापीठात धावाधाव सुरू झाली आहे. विद्यापीठात ऑनलाइन कामकाज कसे सुरू आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले.विद्यापीठात यावर्षीपासून बीए, बीकॉम, बीएस्सी शाखेच्या प्रथम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांची ऑनलाइन नामांकन माहिती सुरू केली आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती विद्यापीठात पाठविली. परंतु, परीक्षेच्या ऑनलाइन कामकाजाची जबाबदारी असलेल्या लर्निंग स्पायरल कंपनीने ही ऑनलाइन नामांकन यादी परीक्षार्थींची नावे म्हणून स्वीकारली आणि ऑनलाइन प्रवेशपत्र पाठविले. एवढेच नव्हे तर त्यांची गुणपत्रिका संबंधित महाविद्यालयांना पाठविण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाच्या गोपनीय विभागात एकच गोंधळ उडाला. दुसरीकडे महाविद्यालये हैराण झाली असून, ऑनलाइन नामांकन यादी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा न देता गुणपत्रिका तयार झाल्या कशा, याबाबत प्रश्न विचारला जात आहे.यवतमाळ येथील दोन महाविद्यालयांनी यासंदर्भात विचारणा केल्यानंतर हा सावळागोंधळ उघड झाला. ऑनलाइन कामकाजामुळे परीक्षा अर्ज आणि महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची नामांकन यादीचे क्रॉस चेकींग करण्यात येत नाही. एजन्सीकडून परस्पर विद्यार्थ्यांच्या माहितीचा डेटा घेतला जातो. त्यामुळे ऑनलाइन नामांकनाची माहिती परीक्षार्थींची यादी म्हणून स्वीकारल्या गेली. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले नाही. तरीही त्यांना ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र पाठविण्यात आले.ऑनलाइन नामांकन माहिती आणि परीक्षा अर्जांची तपासणी करूनच ती विद्यापीठाला पाठविणे आवश्यक आहे. मात्र, काही महाविद्यालयांनी दोनदा माहिती पाठविली. त्यामुळे परीक्षा अर्ज दुसऱ्यांदा घेण्यात आले. याबाबत पुनर्तपासणी सुरू असून, ते सुरळीत करण्यात येत आहे.- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ.

टॅग्स :universityविद्यापीठ