खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्यांची साठवण करा

By Admin | Updated: May 14, 2015 00:04 IST2015-05-14T00:04:39+5:302015-05-14T00:04:39+5:30

मागील खरीप हंगामात पाऊस उशिरा आल्याने व शेंगा भरताना पिकावर ताण पडल्याने सोयाबीनच्या सरासरी उत्तन्नात...

Store soybean seeds for kharif season | खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्यांची साठवण करा

खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्यांची साठवण करा

आवाहन : कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना सूचना
अमरावती : मागील खरीप हंगामात पाऊस उशिरा आल्याने व शेंगा भरताना पिकावर ताण पडल्याने सोयाबीनच्या सरासरी उत्तन्नात घट झाली. त्यामुळे बियाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे.
सोयाबीन हे स्वपराग सिंचित पीक आहे. या पिकाचे सर्व वाण सरळ वाण आहे. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. म्हणून शेतकऱ्यांनी स्वत:जवळील बियाणे वापरण्यासाठी कृषी विभागाद्वारे बीज प्रक्रिया करून पेरणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
कृषी विभागाने दिलेल्या सूचनेनुसार मागील दोन वर्षांत खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून मिळालेल्या उत्पादनातील सोयाबीन येत्या हंगामात बियाणे म्हणुन वापरावे. स्वत:कडील बियाणे शेतकऱ्यांनी वापरल्यास बियाणे खर्चात बचत होईल.
बियाणे साठवताना बियाण्याच्या आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्या पेक्षा जास्त नसावे. सोयाबीण बियाणे अत्यंत नाजूक असुन त्याचे बाहय आवरण पातळ असते. व बियाणांतील बिजांकुर बाहय आवरणाच्या लगत असतात. त्यामुळे बियाणास इजा पोहचू नये व त्याची उगवण क्षमता चांगली राहण्यासाठी बियाणे काळजीपूर्वक हाताळावे. बियाणे साठवतांना व पोत्यांची थप्पी ६ ते ८ थरांची किंवा ७ फुटापेक्षा जास्त नसावी, असे कृषी आयुक्त पुणे यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी तसेच अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Store soybean seeds for kharif season