शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र बापाने ओलांडली मर्यादा; झोपेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 20:12 IST

Amravati : पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करायचा सोडून एका सावत्र पित्यानेच १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दत्तापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे: पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करायचा सोडून एका सावत्र पित्यानेच १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दत्तापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. ७ एप्रिल रोजी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी, पोलिसांनी १५ एप्रिल रोजी रात्री आरोपी उमेश (रा. छत्तीसगढ, ह. मु. धामणगाव रेल्वे तालुका) याच्याविरुद्ध विनयभंग व पोक्सोअन्वये गुन्हा दाखल केला. 

पीडित मुलगी ही ७ एप्रिल रोजी रात्री आपल्या आई आणि सावत्र वडिलांसोबत झोपलेली होती. रात्री साधारण ११ वाजेच्या सुमारास आरोपी सावत्र वडील उमेश याने पीडितेचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर घाबरलेल्या मुलीने तात्काळ आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. मुलीने तक्रार केल्यानंतर आईने तिला तुझे वडील असे पुन्हा करणार नाहीत. असे सांगून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्या कृत्यामुळे पीडित मुलगी प्रचंड दहशतीखाली होती. याच भीतीपोटी तिने ११ एप्रिल रोजी घर सोडले आणि धामणगाव रेल्वे स्थानकावरून नागपूर गाठले. 

तिथून छत्तीसगडला आपल्या मामाच्या गावी जाण्याच्या तयारीत होती. नागपूर रेल्वे स्थानकावर संशयास्पदरीत्या फिरत असताना रेल्वे पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेतले आणि तिची रवानगी सुधारगृहात केली. तिथे मुलीचा जाब नोंदवला असता हा सर्व धक्कादायकी प्रकार समोर आला. सुरुवातीला नागपूर रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो पुढील तपासासाठी दत्तापूर पोलिसांकडे केला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Stepfather violates minor in sleep; outrage in Dhamangaon.

Web Summary : In a shocking incident, a stepfather in Dhamangaon Railway molested his 16-year-old stepdaughter while she slept. The girl fled to Nagpur, where railway police found her. Police have registered a case against the accused under relevant sections.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती