शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगार संघटनेचे धरणे

By admin | Updated: October 15, 2015 00:18 IST

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी विविध मागण्यांची विभाग नियंत्रकांनी दखल न घेतल्याच्या निषेधार्थ प्रादेशिक राज्य महामार्ग कार्यालयासमोर धरणे दिले.

दुर्लक्ष : विभाग नियंत्रकांचा निषेध अमरावती : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी विविध मागण्यांची विभाग नियंत्रकांनी दखल न घेतल्याच्या निषेधार्थ प्रादेशिक राज्य महामार्ग कार्यालयासमोर धरणे दिले.एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना कामगार संघटनेने यापूर्वीच ृपत्रव्यवहार करुन प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची विनंती केली होती. या संदर्भात बैठक लावण्याचे आदेश महामंडळाच्या एमडींनी अमरावती विभाग नियंत्रक के.एम. महाजन यांनी दिले असता त्यांनी त्याची दखल घेतली नाही. या आदेशाला केराची टोपली दाखविली गेल्याचा एसटी कामगार संघटनेचा आरोप आहे. विभाग नियंत्रकांच्या विरोधात विविध मागण्या घेऊन विभागीय कार्यालयासमोर दुपारी ११ वाजता त्यामुळेच धरणे आंदोलन छेडण्यात आले. सर्व समावेशक कॅशलेस योजना लागू करा, कामगार कराराच्या तरतुदीनुसार ३६५ दिवस भरल्यानंतर वार्षिक वेतनवाढ लागू करा, मान्य केल्यानुसार करार, कायदे, परिपत्रकांचा भंग करुन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, नियमबाह्य, शिक्षा रद्द करा, कामगार कराराच्या तरतुदीनुसार निवड श्रेणी, श्रेणीकरण देतांना कनिष्ठ एकत्रित वेतन श्रेणीवरील ५ वर्षाचा कालावधी ग्राह्य धरा, नवीन बस बांधणीसाठी वाढीव श्रमिक तास द्या, चालक-वाहकांची नियमबाह्य कामवाढ रद्द करण्याच्या प्रमुख मागण्यांसदंर्भात महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करुन लक्ष वेधले. आंदोलनात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अमरावती विभाग अध्यक्ष डी.आर. शर्मा, सचिव योगेश ठाकरे, प्रादेशिक सचिव अभय बिहुरे, विलास पाटील, शरद मालविय, उदय पवार, धनंजय दिवाणजी, अ. हमीद, असलम खान एम.ए. देशमुख यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.