एसटी बसेसना लागणार ट्रॅकिंग सिस्टीम, घरबसल्या गाडीचे लोकेशन कळणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 03:55 PM2017-12-05T15:55:30+5:302017-12-05T15:55:56+5:30

अमरावती : प्रवाशांना स्मार्ट सेवा देण्यासाठी एसटी महामंडळात नानाविध उपक्रम राबविले जात असतानाच यात आणखी एका उपक्रमाची भर पडली आहे.

ST buses will be tracking tracking system, home-based location of the train | एसटी बसेसना लागणार ट्रॅकिंग सिस्टीम, घरबसल्या गाडीचे लोकेशन कळणार 

एसटी बसेसना लागणार ट्रॅकिंग सिस्टीम, घरबसल्या गाडीचे लोकेशन कळणार 

Next

जितेंद्र दखाने
अमरावती : प्रवाशांना स्मार्ट सेवा देण्यासाठी एसटी महामंडळात नानाविध उपक्रम राबविले जात असतानाच यात आणखी एका उपक्रमाची भर पडली आहे. प्रवाशांची सुरक्षा व त्यांना बसची माहिती मिळावी यासाठी राज्यातील सर्व एसटी बससेवा ‘ट्रॅकिंग सिस्टीम’ बसविण्यात येणार आहे. या सिस्टीममुळे प्रवाशांना घरबसल्या एसटी बसचे ‘लोकेशन’ समजणार आहे.

या सिस्टीममुळे बसस्थानकात किंवा थांब्यावर गाडीची प्रतीक्षा करणा-या प्रवाशांना गाडीची स्थिती समजणार असल्याने आता प्रवाशांचा त्रास वाचणार आहे. प्रवाशांना आता बसल्या ठिकाणी एसटी बसची माहिती मिळणार आहे. त्यासाठी एसटीच्या सर्व बसेसमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. एखादी बस नेमकी कुठपर्यंत पोहोचली याचा मार्ग काढणे यामुळे शक्य होणार आहे. त्यामुळे बसची प्रतीक्षा करणा-या प्रवाशांना लगेच माहिती मिळण्यासह त्यांच्या सुरक्षेसाठीही या यंत्रणेचा उपयोग होणार आहे.

एसटी बसचे वेळापत्रक सुधारावे आणि प्रवाशांनाही बसची सद्यस्थिती समजण्यास मदत व्हावी, याकरिता महामंडळाकडून मागील वर्षभर व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणेवर काम केले जात आहे. यंत्रणा बसवताना किंवा बसवल्यानंतर येणा-या अडचणी प्रवासी वर्गाला त्याला कितपत फायदा होईल याची माहिती महामंडळाकडून घेतली जात होती. अखेर तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर महामंडळाने ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यासंदर्भातील निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला असला तरी अद्याप विभागीय नियंत्रक कार्यालयास  कुठल्याही सूचना मिळाल्या नसल्याचे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

लोकेशन कळणार
एखादी एसटी स्थानकात किंवा आगारातून वेळेवर पोहोचत नाही त्या एसटीला अनेक कारणांमुळे उशीर होत असतो. त्याचा परिणाम अन्य बससेवेवर होतो. मात्र आता ट्रॅकिंग सिस्टीम यंत्रणेमुळे नियोजित एसटी बसचा ठावठिकाणा समजण्यास मदत होणार आहे. या यंत्रणेमुळे नियोजित आणि अधिकृत बसथांब्यावर एखादी बस न थांबल्यास त्याची माहिती महामंडळाला मिळेल आणि त्यानुसार संबंधित चालक व वाहकावर कारवाईदेखील करता येईल.

Web Title: ST buses will be tracking tracking system, home-based location of the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.