शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बालवाडीच्या नावाखाली आध्यात्मिक केंद्र

By admin | Updated: January 8, 2017 00:18 IST

येथील मौजे राजापेठ परिसरातील सर्वे नं. २६/२ ही जागा महानगरपालिकेच्या मालकीची खुली जागा आहे.

क्रीडांगण बेपत्ता : अनधिकृत बांधकाम, खुल्या जागेत रस्तामनीष कहाते अमरावतीयेथील मौजे राजापेठ परिसरातील सर्वे नं. २६/२ ही जागा महानगरपालिकेच्या मालकीची खुली जागा आहे. जागा जयराम नगर विकास समितीने बालवाडी चालविण्याकरिता मनपाकडून लिजवर घेतली.परंतु, त्या ठिकाणी बालवाडी ऐवजी स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र सुरू आहे. त्यामुळे जयरामनगर मधील क्रिडांगणची जागा शिल्लक नाही. बेकायदेशीर ५ हजार फुटाचे पक्के बांधकाम केलेले आहे. मनपा काय कारवाई करते याकडे जयराम नगरवासीयांचे लक्ष लागले आहे. मनपाची १३४ चौरस मीटर खुली जागा आहे. शासनाच्या धोरणानुसार तिथे बालवाडी, वाचनालय, व्यायाम शाळा आणि क्रीडांगण सुरू करता येते. परंतु, जयरामनगर विकास समितीने शासनाच्या नियमाला गुंडाळून ठेवून तिथे आध्यात्मिक केंद्र सुरू केले आहे. सन २००३ मध्ये जयरामनगर विकास समितीने बालवाडी सुरू करण्याकरिता मनपाकडे खुल्या भूखंडाची मागणी केली होती. त्यानुसार भूखंड देण्यात आला. जयरामनगर मध्ये ५५ घरे आणि ५ अपार्टमेट आहेत. परंतु, खुल्या जागेवरचा क्रीडांगण नाही. त्यामुळे लहान मुले रस्त्यावर खेळतात. अनेक छोटेमोठे अपघात ही झाले आहेत. अध्यात्मिक केंद्राला चारही बाजूने भिंतीचे कम्पाउंड आहे. आतमध्ये भलामोठा हॉल आहे. समोर सिमेंटचा रस्ता आहे. फुलांचे झाडे आहेत. दोन खोल्यांचे पक्के बांधकाम आहे. एक चौकीदाराची खोली आहे. २४ तास केंद्राचे गेट बंद राहते. त्यामुळे बाहेरील माणूस आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. केवळ एकट्याची मालमत्ता झाली असल्याचा समज आहे. खेळाचे क्रिडांगण मनपा उपलब्ध केव्हा करून देणार याकडे जयरामनगरवासियांचे लक्ष लागले आहे. नियमबाह्य बांधकाम असेल, तर पाडण्यात येईल. परवानगी बालवाडीकरिता दिली आहे. - सु. पु. कांबळे, नगररचनाकार, मनपा, अमरावती