शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

-आता विशेष विवाह नोंदणी झाली आॅनलाईन

By admin | Updated: September 11, 2016 00:11 IST

विवाहेच्छुकांना विशेष विवाह कायद्यानुसार विवाह नोंदणीसाठी शासकीय कार्यालयांमध्ये करावी लागणारी पायपीट थांबली आहे.

आधार लिंक अनिवार्य : पायपीट थांबली

अमरावती : विवाहेच्छुकांना विशेष विवाह कायद्यानुसार विवाह नोंदणीसाठी शासकीय कार्यालयांमध्ये करावी लागणारी पायपीट थांबली आहे. विवाह नोंदणीसाठी आता आॅनलॉईन नोंदणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गत चार महिन्यांत जिल्ह्यात २५५ जोडप्यांनी आॅनलाईन विवाह नोंदणीचा लाभ घेतल्याची माहिती आहे.यापूर्वी विवाह नोंदणीची पद्धत ही वेळकाढू होती. त्यामुळे विवाह इच्छुकांना कागदपत्रांची पूर्तता करताना दमझाक व्हायची. मात्र आता विशेष विवाह नोंदणी कायद्यान्वये आधार लिंकिंग करून आॅनलॉईन विवाह नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे वधू-वरांना थेट लग्नासाठीच विवाह नोंदणी कार्यालयात थेट जावे लागणार आहे. या पारदर्शक प्रणालीमुळे विवाहेच्छुकांना शासकीय कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे बंद झाले आहे. विवाह नोंदणी पद्धतीमुळे वधू- वरांना विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन पूर्वी नोंदणी करावी लागत होती. त्यानंतर मिळालेल्या तारखेत सदर कार्यालयात उपस्थित राहून ‘लगीनघाई’ करावी लागत होती. त्यामुळे वधू-वरांना विवाह नोंदणी कार्यालयात किमान दोन वेळा येरझारा माराव्या लागत होत्या. यामुळे अनेक अडचणींना सामारे जावे लागत होते. दरम्यान विवाह नोंदणी अर्ज भरणारे दलाल, वेळेपूर्वी विवाह नोंदणी करून देण्याचे आमीष देऊन वधू-वरांची आर्थिक फसवणूक व्हायची. परंतु आता विशेष विवाह नोंदणी कायद्यामुळे पारदर्शकता आणली गेली आहे. त्यामुळे दलालांकडून होणारी फसवणूक थांबली आहे. वधू-वरांना विवाह नोंदणी सुलभ व्हावी, यासाठी शासनाच्या नोंदणी व मुंद्राक शुल्क विभागाने विवाहासाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. विवाह नोंदणीसाठी कार्यालयात ये- जा करण्याची भानगड संपुष्टात आली आहे. घरूनच विवाह नोंदणी करता येणार आहे. यापूर्वी विवाह नोंदणी करताना कागदपत्रांची पूर्तता, गुंतागुंत बंद करण्यात आली आहे. मे २०१६ पासून विशेष विवाह नोंदणी सुरु झाली आहे. (प्रतिनिधी)१९५४ च्या कायद्यानुसार वधू-वरांना लाभविशेष विवाह नोंदणी करण्याची संधी ही राज्य शासनाच्या मुंद्राक व शुल्क विभागाने १९५४ च्या कायद्यानुसार वधू-वरांना उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत या कायद्यानुसार जिल्ह्यात २५५ जोडप्यांनी विशेष विवाह कायद्याचा लाभ घेतल्याची माहिती आहे. ३ मे २०१६ पासून विशेष विवाह नोंदणी केली जात आहे.आॅनलाईन विवाह नोंदणी करणाऱ्या वधू-वरांना कलम ५ नुसार नोटीस बजावून कागदपत्रांसह विवाह नोंदणीसाठी बोलाविले जाते. दोन साक्षीदार, आधार कार्ड हे अनिवार्य असून नोंदणीनंतर ६० दिवसांच्या आत विवाह करणे बंधनकारक आहे.- अशोक धुळे,दुय्यम निबंधक, अमरावती