शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनावर शेतकऱ्यांची बोळवण

By admin | Updated: July 26, 2014 23:52 IST

जिल्ह्यातील २०० च्या वर शेतकऱ्यांचे सोयाबीन व कपाशी बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी तालुकास्तरीय समिती व जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांकडे दाखल आहेत. याविषयीचे पंचनामे युद्धस्तरावर सुरू आहेत.

बियाणे उगवले नसल्याच्या २०० च्यावर तक्रारी : कोण देणार मोफत बियाणे? कृषी विभाग अनभिज्ञगजानन मोहोड - अमरावतीजिल्ह्यातील २०० च्या वर शेतकऱ्यांचे सोयाबीन व कपाशी बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी तालुकास्तरीय समिती व जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांकडे दाखल आहेत. याविषयीचे पंचनामे युद्धस्तरावर सुरू आहेत. निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली. प्रत्यक्षात हे मोफत बियाणे शेतकऱ्यांना कोण पुरविणार? याविषयी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग अनभिज्ञ आहे. दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यानंतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना आशा दाखविली. मात्र बाजारात विक्रीसाठी असणाऱ्या महाबीजसह नामांकित कंपन्याच्या बियाण्यांची उगवणशक्ती कमी असल्याने पेरलेले बियाणे उगवलेच नाहीत. मूग व उडदाचा कालावधी संपल्याने शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला पसंती दिली. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ लाख ५० हजार ९०० हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. पेरणीसाठी ट्रॅक्टर, मजुरी, बियाणे व खते असा एकरी १० हजारांच्यावर खर्च शेतकऱ्यांनी केला. जिल्ह्यात २५ हजार हेक्टर क्षेत्रामधील बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या क्षेत्रावर दुबार पेरणीचे सावट आहे. तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. ही समिती शेतांचे पंचनामे करीत आहे. या फसगत झालेल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याची घोषणा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमरावती येथे केली. शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळालेले नाहीत. कृषी विभाग केवळ आश्वासनावर शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे. मोफत बियाण्यांचा संभ्रम कायमशेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे निघालेच नाही, अशा शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमरावती येथे २१ जुलै रोजी केली. मात्र हे मोफत बियाणे कोण देणार? याविषयीची माहिती कृषी विभागाला नाही. याविषयी अद्याप संभ्रम कायम आहे. महाबीज ३३५ या वाणांच्या तक्रारीपूर्णानगर येथील शेतकऱ्यांनी गावातील सुमित कृषी सेवा केंद्रातून महाबीज कंपनीचे ३३५ हे बियाणे खरेदी केले. पेरणीपश्चात आठ, दहा दिवसांचा कालावधी ओलांडला असताना बियाणे उगवलेच नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत.