शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण जनजागृतीसाठी सभापती, बीडीओ आदिवासींच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:12 IST

फोटो पी १३ पथक चिखलदरा : कोरोनामुळे जगभर हाहाकार माजला असताना मेळघाटातील आदिवासी लसीकरणाला नकार देत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ...

फोटो पी १३ पथक

चिखलदरा : कोरोनामुळे जगभर हाहाकार माजला असताना मेळघाटातील आदिवासी लसीकरणाला नकार देत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. आदिवासी लसीकरणासाठी पुढे येत नसल्यामुळे प्रशासन हतबल झाल्याचे चित्र होते. प्रशासन आता पाड्यांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्त्व सांगत आहे. त्याचे परिणामही चांगले मिळू लागले आहे. बहाद्दरपूर येथे खुद्द पंचायत समिती सभापती बीडिओ यांनी सरपंच सदस्यांना घेऊन बुधवारी लसीकरणात आदिवासींना सहभागी करून घेतले.

टेंब्रूसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या बहाद्दरपूर येथे बुधवारी कोरोना लसीकरण ठेवण्यात आले होते. आदिवासींचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा, यासाठी चिखलदरा पंचायत समितीचे सभापती बन्सी जामकर, बीडीओ प्रकाश पोळ यांच्यासह माजी सरपंच प्रकाश जामकर, पोलीस पाटील रंजना कोडापे, ग्रामपंचायत सदस्य दीपा कोडापे, रामलाल शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोतीलाल धीकार, वैद्यकीय अधिकारी पिंपरकर, आरोग्य कर्मचारी घोम, कावरे, रेखा वाहुरवाघ, ललिता वरघट, सेविका कल्पना घाटोळ, आशा फुलवंती कास्‍देकर, रामकिसन सावलकर, दिनेश जामनिक, सोनालाल कास्‍देकर आदींना सोबत घेण्यात आले होते. जवळपास ९० टक्के लसीकरण येथे झाले.

बॉक्स

जनजागृतीमुळे चांगला प्रतिसाद

लसीकरणाबाबत आदिवासींमध्ये काहींनी गैरसमज पसरविला होता. मात्र, त्यानंतर महसूल, आरोग्य व पंचायत समितीसह इतर विभागांतील अधिकारी - कर्मचारी, पदाधिकाऱ्यांनी लसीकरणाला नकार देणाऱ्या गावागावांत जाऊन जनजागृती केल्यामुळे आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती तहसीलदार माया माने यांनी ‘लोकमत’ला दिली.