शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

घातक अमरवेलीच्या विळख्यात सोयाबीन

By admin | Updated: September 21, 2014 23:44 IST

जिल्ह्यातील सोयाबीन, मूग व उडीद सारख्या द्विदल धान्यपिकावर मागील २ ते ३ वर्षांपासून ‘अमरवेल’ ही परोपजीवी वेल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमरावती व भातकुली तालुक्यात याचा प्रादुर्भाव

गजानन मोहोड -अमरावतीजिल्ह्यातील सोयाबीन, मूग व उडीद सारख्या द्विदल धान्यपिकावर मागील २ ते ३ वर्षांपासून ‘अमरवेल’ ही परोपजीवी वेल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमरावती व भातकुली तालुक्यात याचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. रोपाच्या अन्नरसाचे शोषण होत असल्याने सरासरी उत्पादनात घट येत आहे. पूर्णपणे नियंत्रणात आणणे कठीण असणाऱ्या या वेलीच्या निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. कृषी विभागाद्वारा हा विषय अद्यापही गंभीरतेने घेतलेला नाही. तसेच याबाबतचे धोरण दिसून येत नाही. जिल्ह्यात सोयाबीन लागवडीचे २ लाख हेक्टरवर क्षेत्र आहे. सोबत तूर, मूग व उडीद अशा द्विदल धान्य पिके आहेत. या पिकावर ‘अमरवेल’ या घातक परोपजीवी तणाचा प्रादुर्भाव झाला. जगभऱ्यात या अमरवेलीच्या १७० प्रजाती आढळून येतात. हे तण परोपजीवी असल्याने द्विदल धान्याप्रमाने द्विदल तणांवर आपले जीवनचक्र पूर्ण करतात. बाल्यावस्थेत असताना ही वेल गुंडाळी करुन दुसऱ्या वनस्पतीचे खोड तसेच पानावर चिकटते व जमिनीपासून विलग होते. त्यानंतर ती झाडामधील अन्नद्रवे सूक्ष्म दातासारख्या असणाऱ्या ‘होस्ट्ररिया’ च्या साह्याने शोषण करते. अन्नद्रवे शोषून घेतल्याने प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ खुंटते. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट येते, अमरवेल पिकामुळे १०० टक्के नुकसान झाल्याची उदाहरणे आहेत‘अमरवेल’ या परोपजीवी तणाचे नियंत्रण करण्यासाठी जगात अजूनपर्यंत हमखास योजना अस्तित्वात नाहीत. या वेलीचा बंदोबस्त करणे जिकरीचे काम आहे. एकाच पध्दतीचा अवलंब न करता एकात्मिक तण व्यवस्थापनाद्वारे यांचे नियंत्रण करणे अनिवार्य ठरते.