शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन उद्ध्वस्त, तरीही आणेवारी ६९ !

By admin | Updated: October 1, 2015 00:15 IST

जिल्ह्यात ५० टक्क्यांवर पेरणीक्षेत्र असणारे सोयाबीनचे पीक पावसाअभावी आणि कीड, रोगांमुळे उद्ध्वस्त झाले असताना ...

 गजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यात ५० टक्क्यांवर पेरणीक्षेत्र असणारे सोयाबीनचे पीक पावसाअभावी आणि कीड, रोगांमुळे उद्ध्वस्त झाले असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने ६९ पैसे इतक्या नजरअंदाज पैसेवारीचा अहवाल बुधवारी शासनाकडे पाठविला. यामुळे जिल्हा दुष्काळी स्थितीतून बाहेर पडला असल्याने हा महसूल विभागाचा तुघलकी निर्णय असल्याचा आरोेप शेतकरी करीत आहेत.प्रचलित ५० पैशांपेक्षा कमी अधिक उत्पन्नाच्या निकषाप्रमाणे सन २०१५-२०१६ या वर्षाकरिता जिल्ह्यातील १,९८१ गावांत ६९ पैसे इतक्या नजरअंदाज पैसेवारीचा हा अहवाल आहे. शासनाच्या १६ सप्टेंबरच्या आदेशान्वये ६७ पैशांपेक्षा कमी-अधिक निकषानुसार जिल्ह्याच्या ५९ पैसे नजरअंदाज पैसेवारीचा अहवाल १८ सप्टेंबरला जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला होता. त्यामुुळे ही दुष्काळजन्य स्थिती गृहित धरण्यात आली होती. परंतु शासनाने २३ सप्टेंबरला पैसेवारीचे सुधारीत निकष मागे घेऊन प्रचलित ५० पैशांपेक्षा कमी-अधिक या निकषाप्रमाणे पैसेवारी जाहीर करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला. त्यानुसार ३० सप्टेंबरला जिल्ह्याची ६९ पैसे इतकी पैसेवारी जाहीर करण्यात आली. या खरीप हंगामात पेरणीनंतर पावसाने मारलेली दडी त्यानंतर पुन्हा ३६ दिवसांचा प्रदीर्घ खंड, पिवळ्या मोझॅकचा अटॅक आदींमुळे सोयाबीनचे पीक संकटात आले आहे. या हंगामात सोयाबीनचे ५० टक्के क्षेत्र आहे. फुलोरावर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पाऊस न पडल्याने सोयाबीनच्या शेंगा पोचट राहिल्यात.तुघलकी अंदाज : ५० पैशांचा प्रचलित निकषआठवड्यात फिरविला निर्णयकेंद्राकडून मदत मागविण्यासाठी शासनाने १५ सप्टेंबरला म्हणजेच १५ दिवसांपूर्वी पैसेवारी जाहीर करण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक जिल्ह्यांचा समावेश दुष्काळीस्थितीत व्हावा, यासाठी ६७ पैशांपेक्षा कमी-अधिक असा निर्णय महसूल विभागाने घेतला. जिल्ह्याची पैसेवारी ५९ पैसे जाहीर झाली असताना सुधारित निकष मागे घेऊन २३ सप्टेंबरला ५० पैशांपेक्षा कमी-अधिक हा निकष जाहीर केला. अवघ्या १२ दिवसांत जिल्ह्याची पैसेवारी ही ५९ पैशांवरुन ६९ पैशांवर पोहोचली. यामुळे जिल्हा दुष्काळीस्थितीतून बाहेर पडला आहे. १५ नोव्हेंबरला सुधारित पैसेवारीजिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात आली. यानंतर खरीप पिकांसाठी पुन्हा १५ नोव्हेंबरला सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात येते व अंतिम पैसेवारी ही १५ जानेवारीला जाहीर करण्यात येते. त्यानुसार शासन दुष्काळीस्थितीचा निर्णय घेते.