शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

-म्हणून ‘ती’ चूक क्षम्य ठरते काय ?

By admin | Updated: April 10, 2017 00:16 IST

दहा महिन्याच्या आरूष नागापुरेवर डॉक्टरने चुकीची शस्त्रक्रिया केल्याचे शनिवारी उघड झाले. त्यामुळे त्याच्या पुढील उपचाराचा सर्व खर्च करण्याची डॉक्टरने दर्शविली आहे.

चुकीच्या शस्त्रक्रियेचे प्रकरण : उपचाराचा सर्व खर्च करणार डॉक्टरअमरावती : दहा महिन्याच्या आरूष नागापुरेवर डॉक्टरने चुकीची शस्त्रक्रिया केल्याचे शनिवारी उघड झाले. त्यामुळे त्याच्या पुढील उपचाराचा सर्व खर्च करण्याची डॉक्टरने दर्शविली आहे. रूग्ण व डॉक्टरांच्या सामंजस्यामुळे हेप्रकरण निवळले. मात्र, रूग्णाच्या नातलगांनी डॉक्टरविरूद्ध तक्रार केली नाही, म्हणून त्यांची चूक क्षम्य ठरू शकते का, असे प्रश्न जागरूक अमरावतीकर विचारत आहेत.चिमुकल्या आरूष नागापुरेच्या डोळ्यावरील भुवईवर एक छोटीशी गाठ आल्याने नागापुरे दाम्पत्याने त्याला खासगी रूग्णालयात नेले. तपासणीनंतर ‘आस्था’ रूग्णालयाचे जनरल सर्जन अभिजित देशमुख यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया विभागात आरूषला नेल्यानंतर देशमुख यांनी गाठीची शस्त्रक्रिया न करता चक्क त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया केली. ही गंभीर चूक नागापुरे दाम्पत्याच्या निदर्शनास येताच त्यांनी डॉक्टरांना जाब विचारला. त्यानंतर हेप्रकरण वाऱ्यासारखे शहरात पसरले.आरुषच्या वेदना जीवघेण्याअमरावती : डॉ.देशमुख यांनी सुरूवातीला चुकीची शस्त्रक्रिया झाल्याचे कबूल केले नव्हते. मात्र, नातेवाईकांचा रोष वाढत असल्याचे पाहून त्यांनी चुकीची कबुली देऊन माफी मागितल्याचे योगेश नागापूरेचे म्हणणे आहे. आरूषवरील पुढील सर्व उपचार मोफत करण्याचे आश्वासन डॉक्टरांनी नागापुरे दाम्पत्यांना दिले. त्यामुळे आता हे प्रकरण शांत झाले. एकीकडे डॉक्टरांवर हल्ले होताहेत त्यामुळे सुरक्षा प्रदान करा, अशी ओरड डॉक्टर करतात. मात्र, डॉक्टरांनीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अशा गंभीर चुका जर डॉक्टरांकडून होत असतील तर रूग्णांच्या नातलगांचा आक्रोश वाढणारच, अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत. चिमुकल्या आरूषला डॉक्टरांच्या चुकीमुळे ज्या वेदना सहन कराव्या लागत आहेत, त्यांची भरपाई डॉक्टर कशी करणार?, त्या वेदनांची जाणीव केवळ नागापुरे दाम्पत्यालाच असू शकते. इवल्याशा आरूषच्या वेदना पाहून त्याच्या आई-वडिलांनी डॉक्टरविरूद्ध तक्रार न करण्याचा निर्णय घेतला. आधी आरूष कसा बरा होईल, याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, नागापुरे दाम्पत्याने तक्रार केली नाही म्हणून डॉक्टरांची चूक क्षम्य ठरू शकत नाही, हेदेखील तेवढेच खरे आहे.