मनीष तसरे - अमरावती : शहरात रात्री ९ वाजता घरी येणाऱ्या सर्व लोकांना प्रश्न पडतो रात्री १२ नंतर शहरात फिरणारे लोक कौन असतील? त्यांचे काम तरी काय राहत असतील, काेठे जात असतील, याची खातर जमा करण्यासाठी लोकमतने शहरात फेरफटका मारून रिॲलिटी चेक केले, असता वास्तवदर्शी चित्र डोळ्यापुढे आले.
शहर रात्री १२ नंतर शांत झाल्यानंतर
स्थळ : बस स्थानक
वेळ :रात्री १२:३०
अमरावती मध्यवर्ती बसस्थानक हे दिवसा अंत्यत गजबजलेले असते. रस्त्यावर वाहनांच्या रांगा असते. मात्र, रात्री १२ नंतर ही वर्दळ थांबलेली दिसून आली. बसस्थानकावर सर्वच बसेस रांगेत उभ्या होत्या. लांबपल्याच्या बसेस रात्री येणार असल्याने मोजकेच ऑटोरीक्षा बसस्थानकावर होते. बसस्थानकावर पोलीस चौकीत पोलीस तौनात हाेते. फलाटावर ३ भटके लोक झोपलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांना चौकशीअंती साेडून दिले.
स्थळ : इर्विन चौक
वेळ : रात्री १:१५
शहरातील वैद्यकीय कामासाठी इर्विन चौकात दिवसभर गर्दी उसळलेली असते. मात्र, रात्री १२:३० नंतर या चौकात स्मशानशांतता होती. रस्त्यावर रुग्णांना सेवा देण्यासाठी अँब्युलन्स इर्विन रुग्णालयाबाहेर उभ्या होत्या. काही ऑटोचालक तेथे रुग्णांना सोडण्यासाठी आल्याचे पहावयास मिळाले. या चौकात काही वेळाने तीन पोलिसांचे वाहन येऊन गेले. त्यांनी उपस्थिांची चौकशी केली. पोलीस चौकशीसाठी आणलेल्या आरोपींना पोलीस चौकीत घेऊन आल्याचे दिसून आले. इर्विन हॉस्पिटलमधील चौकीतील पोलीस कर्मचारी हजर असल्याने येथे येणाऱ्या लोकांचे समाधान होताना पहावयास मिळाले.
स्थळ ; शेगाव नाका चौक
वेळ : रात्री २:०० वाजता
इर्विन चौक ते पंचवटी व पुढे शेगाव नाका चौक या रस्त्यावर दिवसा भरपूर वर्दळ असते. नागपूर व परतवाडा या मार्गावर जाणाऱ्या अनेक लोकांची वर्दळ दिवसा दिसून येते. मात्र, रात्री या मार्गावर कुणीही दिसून आले नाही. शेगाव नाका चौक येथे लागूनच गाडगेनगर पोलीस स्टेशन असल्याने या चौकात रात्री २ वाजता पोलीस त्यांच्या ताफ्यासह हजर होते. दोन दुचाकीस्वरांची त्यांनी चौकशीदेखील केली.
----------------------------------------------------------------------------------------------
अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीत रात्रीच्या गस्तीकरिता वाहने
---------------------------------------------------------------------------------------
चारचाकी वाहने-- २६
दुचाकी वाहने --१६
---------------------------
पोलीस कर्मचारी व अधिकारी --११०
----------------------------------------------
पोलीस आयुक्त यांचा काेट
शहरातील नागरिकांची काळजी घेणे आणि त्यांना सुरक्षित ठेवणे, हे आमचे काम आहे. रात्री गस्तीवर पोलीस अधिकारी व कर्मचारी असतात. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह ते रात्री गस्त घालतात. संपूर्ण वाहनांना जीपीएस यंत्रणा कार्यान्वित असल्याने प्रत्येकाचे लोकेशन मिळविणे सहज शक्य होते. रात्री ११ नंतर दररोज ११० पेक्षा जास्त पुरुष व महिला अधिकारी जनतेच्या सवेत असतात.