शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात उडविले गेले 'आकाश कंदील'

By admin | Updated: November 1, 2016 00:22 IST

दिवा प्रज्ज्वलित करून आकाशात कंदील उडविल्यास तो फौजदारी गुन्हा ठरू शकतो, ..

डीसीपींच्या आदेशाचे उल्लंघन : फौजदारी कारवाई केव्हा ?अमरावती : दिवा प्रज्ज्वलित करून आकाशात कंदील उडविल्यास तो फौजदारी गुन्हा ठरू शकतो, असे आदेश पोलीस उपायुक्तांनी शनिवारी काढले. तरीसुद्धा आदेशाचे उल्लंघन करीत फटाका विक्रेत्यांजवळून आकाश कंदील विकत घेऊन नागरिकांनी सर्रास ते हवेत उडविले. ही बाब धोकादायक ठरणारीच होती. मात्र, सुदैवाने काही अप्रीय घटना घडली नाही. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर व आकाश कंदील उडविणाऱ्यावर फौजदारी केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या आदेशाचे पालन काटेकोरपणे व्हावे सहायक पोलीस आयुक्त पी.डी.डोंगरदिवे यांनी संबंधित ठाणेदारांना पत्राद्वारे कळविले. तरीदेखील आकाश कंदील विक्री व उडविल्याचे आढळून आले.दिवाळी सणानिमित्त शहरातील बाजारपेठेत विविध प्रकारच्या फटाक्यांची विक्री करण्यात आली. या फटाक्यामध्ये आकाशात उडविणाऱ्या कंदीलावर यंदा बंदी घालण्यात आली होती. दिवा प्रज्ज्वलित करून आकाशात कंदील सोडल्यास तो हवेच्या दिशेने उडत राहतो. मात्र, दिव्यातून निघणारा गॅस संपताच तो आकाश कंदील कुठेही जाऊन पडण्याची शक्यता असते. हे कंदील रहिवासी ठिकाणी, कारखाने, वने व इतर ठिकाणी पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा उडत्या कंदिलाच्या विक्रीवर यंदा पोलीस विभागाकडून बंदी घालण्यात आली होती.यासंदर्भात पोलीस विभागाकडून आदेश जारी करण्यात आले होते. त्यामुळे आकाश कंदील बाजारपेठेत विक्री केले जात असेल, किंवा असे कंदिल आकाशात उडविला जात असेल, तर अशा नागरिकांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशा आदेशाचे पत्र डीसीपींनी काढले होते. नागरिकांनी जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करताना अनेक जण आढळून आले असून बाजारपेठेतसुध्दा अशा घातक ठरणाऱ्या आकाश कंदिलाची सर्रासपणे विक्री करण्यात आली आहे. याकडे पोलीस विभागाने गांभीर्याने लक्ष पुरविले नसून कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. आकाश कंदील विक्री व उडविणाऱ्यांची माहिती हाती लागल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यासंदर्भात एसीपींना सूचना देण्यात आल्या आहेत. - दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त