शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य विकास ही चळवळ व्हावी

By admin | Updated: May 24, 2016 00:41 IST

देशात तंत्रज्ञानाचा खूप विकास झाला, शहरीकरण वाढले. आपल्या देशाने मोठी प्रगती केली.

रणजित पाटील : विद्यापीठात मानवी संसाधन निर्मितीवर कार्यशाळाअमरावती : देशात तंत्रज्ञानाचा खूप विकास झाला, शहरीकरण वाढले. आपल्या देशाने मोठी प्रगती केली. परंतु कौशल्यपूर्ण मानवी संसाधने पाहिजे त्या प्रमाणात निर्माण झाली नाहीत. त्यासाठी कौशल्य विकास चळवळ व्हावी, असे प्रतिपादन अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांनी केले.विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक डॉ.के.जी. देशमुख सभागृहात ‘कौशल्यपूर्ण मानवी संसाधने निर्माण करण्यासाठी विद्यापीठाची भूमिका’ या विषयावर आयोेजित एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू विलास सपकाळ होते. तर प्रमुख अतिथी म्हणून खा. आनंदराव अडसूळ, नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर अनिल सोले, एमएसएमईचे नागपूरचे संचालक पी.एम.पार्लेवार, एमजीआरआयचे वर्धा येथील संचालक पी.व्ही.काळे, एफआयएव्हीचे अध्यक्ष किरण पातुरकर, कुलसचिव अजय देशमुख, बीसीयूडीचे संचालक आर.एस.सपकाळ, उपसंचालक महेश देशपांडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. रणजित पाटील म्हणाले, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हे सूत्र आज नेमके उलट झाले आहे. नोकरी मिळावी, यासाठी शिक्षण घेतले जाते. पालक पोटाला चिमटा देऊन पाल्यांना शिकवितात. त्यामुळे त्याला रोजगार मिळावा, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. समाजाला जे लागतात, ते अभ्यासक्रम सुरू करण्यावर देशाचे पंतप्रदान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री यांचा भर असून शिक्षण आणि कौशल्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खा. अडसूळ, कुलगुरू सपकाळ यांनी देखील यावेळी समयोचित मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)