शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

चालकाला अंधारी, बसला अपघात; सहा प्रवासी गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2021 2:52 PM

बसमधील चालकाला डोळ्यांपुढे अचानक अंधारी आल्याने नियंत्रण सुटले. करकचून ब्रेक दाबल्याने रस्त्याच्या कडेला बस थांबली. या घटनेत ६ प्रवासी जखमी झाले.

ठळक मुद्देदर्यापूर-अमरावती मार्गावरील घटना, बस रस्त्याच्या कडेला

अमरावती : अमरावती-दर्यापूर मार्गाने वर्धाकडे निघालेल्या आकोट आगाराच्या बसमधील चालकाला डोळ्यांपुढे अचानक अंधारी आल्याने नियंत्रण सुटले. करकचून ब्रेक दाबल्याने रस्त्याच्या कडेला बस थांबली. या घटनेत बसमधील १५ पैकी ६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली.

खोलापूरनजीक महावितरणच्या वीज केंद्रापुढे हा अपघात घडला. रामेश्वर एगळे (५५, रा. शिंगणापूर), शकुंतला एगळे, हिंंमतराव धाडे (रा. उमरा, ता. आकोट), सहदेव मेश्राम (७१, रा. अमरावती), बेबीबाई थोरात (रा. जळका हिरापूर), संतोष इंगळे (३६, रा. बडनेरा) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच खोलापूर ठाण्याचे ठाणेदार आपल्या पोलीस व घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. बसमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना ठाणेदारांनी पोलीस व्हॅनमध्ये बसून खोलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता आणले. तेथून प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, गजानन वानखडे असे किरकोळ जखमी झालेल्या बसचालकाचे नाव आहे. त्यांना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर बस घटनास्थळी उभी असल्याचे खोलापूर पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातPublic Transportसार्वजनिक वाहतूक