शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सहा अभियांत्रिकीच्या रोखल्या गुणपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार महाविद्यालये अथवा प्राध्यापकांचा परीक्षा व मूल्यांकनात सहभाग अनिवार्य केला आहे. मात्र, काही महाविद्यालयांतील प्राध्यापक त्यांच्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत विद्यापीठात मूल्यांकनासाठी सहभाग घेत नाहीत.

ठळक मुद्देप्राचार्यांची कुलगुरूंसमक्ष पेशी : कमी मूल्यांकन भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित सहा अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या गुणपत्रिका रोखण्यात आल्या आहेत. संबंधित महाविद्यालयांच्या प्राध्यापकांनी मूल्यांकनात कुचराई केल्याप्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे. या अभियांत्रिकीच्या प्राचार्यांची २३ जानेवारी रोजी कुलगुरूंसमक्ष पेशी होणार आहे. त्याअनुषंगाने प्राचार्यांना नोटीस बजावण्यात आली आहेमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार महाविद्यालये अथवा प्राध्यापकांचा परीक्षा व मूल्यांकनात सहभाग अनिवार्य केला आहे. मात्र, काही महाविद्यालयांतील प्राध्यापक त्यांच्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत विद्यापीठात मूल्यांकनासाठी सहभाग घेत नाहीत. विद्यापीठ नियमानुसार महाविद्यालयात परीक्षार्थ्यांच्या संख्येनुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त संबंधित प्राध्यापकांनी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे अपेक्षित आहे. परंतु विद्यापीठांतर्गत सहा अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांचा मूल्यांकनात वाटा अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने या सहा महाविद्यालयांच्या प्राचार्यांना नोटीस बजावून कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्यासमक्ष गुरूवारी पेशी होणार आहे. मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना का पाठविले नाही? याची कारणमीमांसा प्राचार्यांना द्यावी लागणार आहे. कारणांमध्ये काही चुकीचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे संकेत आहे. तथापि याप्रकरणी कुलगुरू अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती आहे. सहा अभियांत्रिकींचा निकाल आॅनलाईन जाहीर करण्यात आला असून, केवळ विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका रोखण्यात आल्या आहेत.३, ५ व ७ सेमिस्टर निकालाच्या गुणपत्रिका देण्यात आल्या नाहीत. प्राचार्यांची पेशी आणि वस्तुनिष्ठ खुलाशानंतर याप्रकरणी पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. ५,४०० विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका रोखण्यात आल्या आहेत.गुणपत्रिका रोखलेली ही सहा महाविद्यालयेबाबासाहेब नाईक अभियांत्रिकी, पुसदजगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळअरूणा अभियांत्रिकी महाविद्यालय, चिखलीकोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरजी.एस. रायसोनी अभियांत्रिकी,अमरावती.शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, बुलडाणा

टॅग्स :universityविद्यापीठ