शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सिपना, गडगा नदी कोरडीठण्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 10:27 PM

मेळघाटसाठी जीवनदायिनी ठरणारी गडगा आणि सिपना नदी सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. वर्षभर पात्रात पाणी बाळगणाऱ्या या नदीतून मोठ्या प्रमाणात मोटर पंपद्वारे उपसा करण्यात येत असल्यामुळे ती फेब्रुवारी महिन्यापूर्वीच आटली आहे.

ठळक मुद्देहिवाळा संपण्यापूर्वीच आटली : वन्यप्राणी, पाळीव प्राण्यांची तृष्णा भागणार कशी?

श्यामकांत पाण्डेय।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाटसाठी जीवनदायिनी ठरणारी गडगा आणि सिपना नदी सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. वर्षभर पात्रात पाणी बाळगणाऱ्या या नदीतून मोठ्या प्रमाणात मोटर पंपद्वारे उपसा करण्यात येत असल्यामुळे ती फेब्रुवारी महिन्यापूर्वीच आटली आहे.मेळघाटातच उगम आणि याच प्रदेशात वाहणाºया गडगा आणि सिपना नदी मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. या दोन्ही नद्यांचे उगम चिखलदरा तालुक्यात आहेत आणि धारणी तालुक्यातील तापी नदीमध्ये त्या विसर्जित होतात. यादरम्यान येणाºया अनेक गावांतील दैनंदिन गरजा भागविण्याचे काम तापी आणि सिपना नदी अविरतपणे करीत आलेली आहे. या दोन्ही नद्यांवर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आलेले आहेत. परंतु, सिंचन विभागाच्या ढिसाळ धोरणामुळे या नदीचे पात्रात पाणी अडविण्याचे काम झालेले नाही. त्यामुळे मेळघाटातील जंगलातील वन्यप्राण्यांसह पाळीव प्राण्यांनासुद्धा यावर्षी भीषण त्रास होणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणीही या नद्यांमधील पाण्यानी तृष्णा भागवतात. मात्र, उन्हाळा लागण्यापूर्वीच नद्या कोरड्या पडल्याने वन्यप्राणी गावांकडे येण्याची भीती व्यक्त होत आहे. हिवाळा संपायला १३ दिवस शिल्लक असतानाच मेळघाटात भीषण पाणीटंचाईची चाहूल लागली आहे.ही गावे अवलंबूृनतालुक्यातील सिपना, खापरा, खंडू, दवाल, तापी, गडगा या प्रमुख नद्यांवर शकुपाटी, धारणमहू, ढाकरमल, निरगुडी, चेथर, केकदा, चटवाबोड, काटकुंभ, बुलुमगव्हाण, कसाईखेडा, भोंडीलावा, बैरागड, कुटंगा, रंगुबेली, हरदा, सावलखेडा, पोहरा, हरदोली, चाकर्दा, गोबरकहू, कारादा, चिपोली, पाटीया, तांगडा, आठनादा, दुनी, बाजारढाणा, काकरमल, रोहणीखेडा, दाबीदा, अंबाडी, नागुढाणा, खारी, झिल्पी, साद्राबाडी, गौलानडोह, सुसर्दा, राणापीसा, लाकटू, डाबका, सावलीखेडा, नागझीरा, धुळघाट रेल्वे, राणीगाव, हिराबंबई, दादरा, भंवर, रेहट्या, नारदू, गोलई, शिवाझिरी ही गावे अवलंबून आहेत.