शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
5
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
6
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
7
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
8
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
9
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
10
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
11
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
12
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
13
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
14
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
15
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
16
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
17
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टकट रेल्वे क्रॉसिंग ठरते जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST

रेल्वे रूळ ओलांडून जाण्याची नागरिकांची पद्धत ही अवैध आणि जीवघेणी आहे. रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करू नये, हे जीवघेणे ठरणारे आहे, असे स्थानकावर वारंवार उद्घोषकाद्वारे सूचना केल्या जातात. या सूचनांचा अव्हेर रेल्वेचे चालक-गार्ड यांच्याकडूनही होतो. फलाटाला लागून असलेल्या पादचारी पुलाचा वापर न करता ते थेट विश्रांतीसाठी असलेली लॉबी गाठतात. मालवाहतुकीमुळे रेल्वे स्थानकावर चालक, गार्ड यांची रेलचेल वाढली आहे.

ठळक मुद्देपुलावरून पायपीटचा कंटाळा : नागरिकांसह रेल्वे कर्मचाऱ्यांकडून नियमाला ठेंगा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेल्वे रुळावरून क्रॉसिंग करता येत नाही, अशी रेल्वे विभागाची नियमावली आहे. मात्र, बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांसह रेल्वे कर्मचारीसुद्धा रेल्वे क्रॉसिंगद्वारे शॉर्टकट मार्ग शोधतात. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास अवघ्या पाच मिनिटांत १५ जणांनी रूळ ओलांडून बडनेरा रेल्वे स्थानक पार केले. यावरून दिवसभराचा अंदाज येऊ शकतो. हल्ली प्रवासी गाड्या बंद असल्या तरी रेल्वेची मालवाहतूक सुरू आहे.
रेल्वे रूळ ओलांडून जाण्याची नागरिकांची पद्धत ही अवैध आणि जीवघेणी आहे. रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करू नये, हे जीवघेणे ठरणारे आहे, असे स्थानकावर वारंवार उद्घोषकाद्वारे सूचना केल्या जातात. या सूचनांचा अव्हेर रेल्वेचे चालक-गार्ड यांच्याकडूनही होतो. फलाटाला लागून असलेल्या पादचारी पुलाचा वापर न करता ते थेट विश्रांतीसाठी असलेली लॉबी गाठतात. मालवाहतुकीमुळे रेल्वे स्थानकावर चालक, गार्ड यांची रेलचेल वाढली आहे. फलाटावर ये-जा करण्यासाठी पादचारी पूल, स्वयंचलित पायऱ्या, रॅम्पची व्यवस्था आहे. तथापि, रेल्वेचे चालक, गार्ड हेच नियम गुंडाळून रेल्वे क्रॉसिंग ओलांडून ये-जा करतात. हीच या परिसरातील नागरिकांचीही तºहा आहे.

माताफैल परिसरातून सर्रास रेल्वे क्रॉसिंग
माताफैल भागातील रहिवासी रेल्वे रूळ ओलांडूनच ये-जा करतात. बाजारपेठ, रोजगार अथवा कामानिमित्त नवीवस्ती भागात ये-जा करणाऱ्यासाठी याच शॉर्टकटला ते प्राधान्य देत आले आहे. ही बाब कोणत्याही क्षण जीवघेणी ठरू शकते.

रेल्वे सुरक्षा बलाचे दुर्लक्ष
बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात चालक, गार्ड यांच्या विश्रांती, जेवणाच्या सुविधेसाठी लॉबी आहे. या लॉबीच्या बाजूला रेल्वे सुरक्षा बलाचे कार्यालय आहे. रेल्वे रूळ ओलांडूनच लॉबीमध्ये ये-जा करीत असताना चालक, गार्ड हे आरपीएफ अधिकाऱ्यांना दिसू नये, याचे आश्चर्य मानले जात आहे. सामान्य प्रवासी अथवा नागरिकांनी रेल्वे क्रॉसिंग केले, तर कायदेशीर कारवाई केली जाते. ही नियमावली चालक, गार्ड यांना का लागू नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वे