धक्कादायक ! नात्याला काळिमा फासणारी घटना ; सासरा आणि दिराकडून विवाहितेवर अत्याचार
By प्रदीप भाकरे | Updated: March 7, 2026 19:04 IST2026-03-07T19:01:58+5:302026-03-07T19:04:53+5:30
Amravati : नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना चांदूर रेल्वे तालुक्यात उघडकीस आली आहे. एका ३० वर्षीय मतिमंद विवाहितेवर तिच्याच सासऱ्याने आणि दिराने गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Shocking! An incident that tarnishes the relationship; Married woman tortured by father-in-law and sister-in-law
अमरावती : नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना चांदूर रेल्वे तालुक्यात उघडकीस आली आहे. एका ३० वर्षीय मतिमंद विवाहितेवर तिच्याच सासऱ्याने आणि दिराने गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी ६ मार्च रोजी गुन्हा दाखल करून आरोपी सासऱ्याला अटक केली, तर पीडितेचा दीर पसार झाला आहे.
एफआयआरनुसार, पीडित महिला ही ३० वर्षांची असून ती मतिमंद आहे. तिचे लग्न तीन वर्षांपूर्वी चांदूर रेल्वे तालुक्यातील रहिवासी असलेल्या व्यक्तीशी रीतिरिवाजाप्रमाणे झाले होते. पीडितेचा पतीदेखील मतिमंद आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे सासरे हनुमंत (६९) आणि तिचा दीर हे दोघेही गेल्या दोन महिन्यांपासून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होते. हा प्रकार सहन न झाल्याने पीडितेने आपली आपबिती आईला सांगितली. पीडितेच्या आईने तत्काळ आपल्या पतीला अर्थात पीडितेच्या वडिलांना या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी चांदूर रेल्वे पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.