शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

शिवशाहीच्या बसचे हप्ते थकले; फायनान्स कंपनीकडून जप्तीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 7:06 PM

प्रवाशांना रस्त्यावरच उतरावे लागले.

अमरावती : गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या वाट्याला परिवाहन खाते आले होते. यामुळे राज्यभरात  शिवशाही बस सुरु करण्यात आल्या होत्या. यामध्ये खासगी कंत्राटदारांच्या बसेसही आहेत. या शिवशाही बसेसच्या सेवेबद्दल अनेकदा तक्रारी येत होत्या. आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पुण्यातून अमरावतीला निघालेल्या प्रवाशांना रस्त्यातच उतरावे लागले आहे. 

पुण्याहून अमरावतीकडे २२ प्रवासी घेऊन निघालेली शिवशाही बस एका फायनान्स कंपनीने हप्ते थकविल्याने बोरगाव मंजुजवळ जप्त केली. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच उतरावे लागले. फायनान्स कंपनीने एका चारचाकी वाहनाची सोय करून प्रवाशांना अमरावतीपर्यंत सोडून दिल्याने त्यांना दिलासा मिळाला. 

 पुण्याहून एमएच २९ बी १०१९ या क्रमांकाची शिवशाही बस सायंकाळी ७ वाजता २२ प्रवासी घेऊन अमरावतीकरिता निघाली होती. शिवशाही बसेस या महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या अधिकार क्षेत्रात जरी चालत असल्या तरी, त्या खासगी आहेत. खासगी कंपनींकडून या बसेस चालविल्या जातात. संबंधित कंपनीने शिवशाही बस ही फायनान्सवर खरेदी केली होती. तिचे हप्ते थकीत असल्यामुळे कंपनीने जप्तीची कारवाई केली. बोरगाव मंजू बस स्थानकावर सकाळी ७ वाजता फायनान्स कंपनीचे कर्मचारी शिवशाही बसच्या आडवे होऊन चालक पोहोकारकडून बसची चावी घेतली. बसमधून प्रवाशांसह चालक व वाहकाला उतरून घातले. बस बोरगाव मंजू बस स्थानकावर जप्त करून उभी केली आहे. 

सदर शिवशाही बस पांढरकवडा येथील कंपनीची असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत आगारप्रमुख जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता, शिवशाही बस जप्त केल्याची माहिती मिळाली. मात्र, त्यासंबंधित कंपनीकडून कुठल्याही प्रकारचे कागदपत्र अद्याप प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Shivshahiशिवशाही