शहानूरच्या पुलावरील खड्यात लावले बेशरमचे झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:16 AM2021-08-21T04:16:49+5:302021-08-21T04:16:49+5:30

समता परिषदकडून निषेध वनोजा बाग : शहरातील सुर्जी व जुन्या बसस्थानकाला जोडणाऱ्या पूलाच्या मध्यभागी आरपार खड्डे पडले आहे. यामुळे ...

Shameless tree planted in the pit on Shahnoor's bridge | शहानूरच्या पुलावरील खड्यात लावले बेशरमचे झाड

शहानूरच्या पुलावरील खड्यात लावले बेशरमचे झाड

Next

समता परिषदकडून निषेध

वनोजा बाग : शहरातील सुर्जी व जुन्या बसस्थानकाला जोडणाऱ्या पूलाच्या मध्यभागी आरपार खड्डे पडले आहे. यामुळे अपघाताची शक्यता असून नगर परिषदेचे दुर्लक्ष असल्याने १९ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष विपुल नाथे यांच्या नेतृत्वात त्या खड्यात बेशरमचे झाड लावून निषेध नोंदविण्यात आला.

या पुलाजवळ वैकुंटधाम (स्मशानभूमी) असून अकोट - अंजनगाव रोडवर जाण्याकरिता कसरत करावी लागत आहे. म्हणून वैकुंटधामपर्यंत रोड व्हावा, या मागणीसाठी यापूर्वी उपोषण करण्यात आले. त्यावेळी प्रशासनाने आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले. या चढावर तसेच पुलाच्या खड्ड्यात आतापर्यंत बरेच अपघात घडले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने त्वरित याची दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी समता परिषदचे जिल्हाध्यक्ष विपुल नाथे यांनी केली आहे.

विशेष बाब म्हणजे या पुलावरून नगर परिषदचे बांधकाम अभियंता, न.प.चे उपाध्यक्ष व आठ नगरसेवक सतत ये-जा करतात. तरीसुद्धा दखल घेतली जात नाही. त्यामुळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने बेशरम चे झाड लावून निषेध केला. या वेळी समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विपुल नाथे, विदर्भकुमार बोबडे, नंदकिशोर चांदुरकर, राजेश काळे, सुरेश शेगोकर, गजानन कळमकर, गोपाल नवले, अतुल बॊरोडे, प्रल्हाद गोरडे, शिवदास येवले, परमेश्वर श्रीवास्तव, प्रज्वल फुलारी, अनंत फुलारी, मंगेश लामखडे, नरेश हरणे, योगेश देवरे विजय वाठ, पीयूष चांदूरकर, प्रणित घटारे, आयुष चांदूरकर, शाम चांदूरकर, धीरज काळे, अतुल हाडोळे, चेतन खंडारे, अशोक कोणे, शाम मोरे, सुरेंद्र अडगोकर आदी हजर होते.

Web Title: Shameless tree planted in the pit on Shahnoor's bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.