शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला अमानुष मारहाण करणारा शालिकराम गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:26 IST

काजना-राजन्यातील रहिवासी शालीकराम रोडगेने पत्नी दीक्षावर अनन्वित अत्याचार केले. कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीला मारहाण हे अमानवी कृत्यच होय. त्यात दीक्षाला झालेली मारहाण ही गंभीर स्वरूपाची आहे. तिला गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ठळक मुद्देलोणी पोलिसांची कारवाई : ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पत्नीला अमानुष मारहाण करणारा निर्दयी शालिकराम रोडगे याला अखेर लोणी पोलिसांनी बुधवारी अटक करण्यात यश मिळविले. त्याला नांदगाव खंडेश्वर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.काजना-राजन्यातील रहिवासी शालीकराम रोडगेने पत्नी दीक्षावर अनन्वित अत्याचार केले. कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीला मारहाण हे अमानवी कृत्यच होय. त्यात दीक्षाला झालेली मारहाण ही गंभीर स्वरूपाची आहे. तिला गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या आईने मुलीला झालेल्या अमानुष मारहाणीची लोणी पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यावरून तिचा पती शालीकराम रोडगेविरुद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम ३२६ अन्वये गुन्हा नोंदविला. गेल्या तीन दिवसांपासून लोणी पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता. मंगळवारी उशिरा रात्री शालिकराम मुलांना भेटण्यासाठी काजना येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयासमक्ष हजर केले.दीक्षाला ज्या साहित्यांनी मारहाण केली, ते साहित्य जप्तीसाठी पोलिसांनी शालीकरामची पोलीस कोठडी मागितली. त्यानुसार न्यायालयाने शालिकरामला ३१ ऑगस्टपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली.दीक्षावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड १४ मध्ये उपचार सुरू आहे. औषधोपचार सुरू असला तरी तिच्या मानसिक व शारीरिक वेदना अद्याप कमी झालेल्या नाहीत.

जीवे मारण्याची कलम दाखल होण्याची शक्यतादीक्षाचे इर्विन चौकीतील पोलीस हवालदार गजानन सोनवणे व गणेश कावरे यांनी बयाण नोंदविल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. हरीश कुंडे यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. तो अहवाल बुधवारी चौकीतील पोलिसांना मिळाला. तिच्या अंगावरील जखमा या जिवे मारण्यास कारणीभूत ठरण्याइतपत असल्याचे अहवालात नमूद आहे. यामुळे गुन्ह्यात भादंवि कलम ३०७ वाढण्याची शक्यता आहे.पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या शालिकराम रोडगेला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करायचे आहे. न्यायालयाने त्याला ३१ आॅगस्टपर्यंतची पोलीस कोठडी सुनावणी आहे.- सुरेंद्र अहेरकर,पोलीस निरीक्षक, लोणी ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी