शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर लैंगिक अत्याचार, सावत्र पित्याला जन्मठेप

By admin | Updated: November 1, 2014 01:25 IST

मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम सावत्र बापाला स्थानिक जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी बाल ...

अमरावती : मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम सावत्र बापाला स्थानिक जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी बाल लैंगिक प्रतिबंध कायद्याच्या कलम ६ अन्वये आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. विधी सूत्रांनुसार, आरोपीचे नाव दिलीप टेकन (४२) असे आहे. ही घटना राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बडनेरा मार्गावरील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ वर्ष २०१३ मध्ये घडली होती. आरोपी दिलीप याचे एका विधवेसोबत अनैतिक संबंध होते. घटनेच्या तीन वर्षांपूर्वी दोघेही लग्न न करताच एकत्र राहात होते. विधवा महिलेला १६ वर्षांची एक मुलगी आणि एक लहान मुलगा आहे. सदर महिला जानेवारी २०१३ मध्ये काही कामानिमित्त मध्य प्रदेशच्या बैतूल येथे दोन-चार दिवसांपूर्वी गेली होती. मुलगी घरी एकटीच होती. याच संधीचा फायदा उचलून दिलीपने अल्पवयीन मुलीवर दोन दिवस बलात्कार केला. मुलीने ती गर्भवती झाल्यानंतर ही बाब आईला सांगितली. आईच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी १ एप्रिल २०१३ मध्ये आरोपी दिलीप टेकनविरूध्द कलम ३७६ व बाल लैंगिक प्रतिबंधक काद्यातील कलम ६,४ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. महिला उपनिरीक्षक सुषमा बाविस्कर यांनी प्रकरणाची चौकशी करून ३० जून रोजी न्यायालयात चार्जशिट दाखल केली होती. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी दिलीप टेकन याला आजीवन कारावास, दोन हजार रूपये दंड आणि एक वर्ष अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील सुनील देशमुख व परवेज खान यांनी काम पाहिले.