शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सात बाजार समिती होणार बरखास्त

By admin | Updated: November 8, 2014 22:30 IST

जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी प्रशासक मंडळ नेमण्यात आलेल्या पाच आणि मुदतवाढ देण्यात आलेल्या दोन बाजार समित्या बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

अमरावती : जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी प्रशासक मंडळ नेमण्यात आलेल्या पाच आणि मुदतवाढ देण्यात आलेल्या दोन बाजार समित्या बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्याने आरूढ झालेल्या भाजप शासनाने हा निर्णय घेतला असून आदेश प्राप्त झाल्यानंतर बरखास्तीची कारवाई करण्यात येईल. कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये अनियमितता आणि शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे अमरावतीसह राज्यातील सुमारे १७० कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रत्यक्ष कारवाई बाबतचा आदेश धडकताच जिल्ह्यातील सात बाजार समित्या बरखास्त केल्या जातील. सहकार मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, जिल्ह्यात अमरावती, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, अंजनगाव सुर्जी या पाच बाजार समित्यांवर सध्या प्रशासक मंडळ कार्यरत आहे. तर वरूड आणि दर्यापूर या दोन कृषी उत्पन्न बाजार समितींच्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळालेली आहे. या सातही बाजार समित्या बरखास्त होतील. जिल्ह्यात एकूण १३ कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्वात आहेत. गेल्या काही वर्षांत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे. याशिवाय अनियमितता आणि शेतकऱ्यांच्या अडवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा निर्णय जाहीर करताच आघाडी सरकारमधील काँगे्रस व राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींचे भवितव्य धोक्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे या बाजार समित्यांच्या माध्यमातून राजकारणाची पोळी शेकणाऱ्यांनाही हादरा बसला आहे. बाजार समित्या बरखास्तीचा निर्णय शासनाकडून केव्हा धडकतो, याबाबत उत्सुकतेचे वातावरण दिसून येत आहे. (प्रतिनिधी)