शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण फिरताना आढळल्यास वाहन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:15 IST

अमरावती : लॉकडाऊन असतानाही नागरिक विनामास्क विनाकारण फिरताना आढळून येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात ...

अमरावती : लॉकडाऊन असतानाही नागरिक विनामास्क विनाकारण फिरताना आढळून येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात असून, गुरुवारपासून विनाकारण दुचाकी, चारचाकी वाहनांतून फिरताना आढळून आल्यास वाहन चालकांवर गुन्हा नोंदवून वाहन जप्त करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिली.

आरती सिंह यांनी बुधवारी शहर हद्दीतील अनेक नाकाबंदी पॉइंट व फिक्स पाइंटला भेटी देऊन स्वत: काही वाहन चालकांना थांबवून कसून चौकशी केली.

तपासणीदरम्यान त्यांच्या असे निदर्शनास आले की, यापूर्वीच्या लॉकडाऊनपेक्षा सध्या राबविण्यात येत असलेल्या लॉकडाऊनमध्ये न्यायालय, एमआयडीसी, सर्व शासकीय कार्यालये, रेल्वे, बसेस, तसेच हॉटेलमधून पार्सल सुविधा सुरू ठेवण्याची सवलत प्रशासनाने दिली आहे. मात्र, या व्यतिरिक्तही इतर नागरिक हे जास्त संख्येने घराबाहेर पडून सवलतींचा गौरफायदा घेताना आढळून आले आहे. नागरिक विनाकारण लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. त्यामुळे आला विनाकारण रस्त्यावर वाहन चालक आढळून आल्यास त्यांचे वाहन जप्त करा, तसेच दंड वसूल करण्यात येईल, तसेच भारतीय दंड विधान, आपत्ती व्यवस्थापन कायदा, तसेच साथरोग अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये, प्रशासनाला मदत करावी, असे आवाहनही यावेळी पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी केले.