नात्याला काळीमा फासणारी घटना, घरी कुणीच नाही पाहून चुलत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

By प्रदीप भाकरे | Updated: August 17, 2023 13:38 IST2023-08-17T13:37:18+5:302023-08-17T13:38:19+5:30

भातकुली तालुक्यातील घटना : वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकी

Seeing that no one is at home, cousin father-in-law rapes daughter-in-law | नात्याला काळीमा फासणारी घटना, घरी कुणीच नाही पाहून चुलत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

नात्याला काळीमा फासणारी घटना, घरी कुणीच नाही पाहून चुलत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

अमरावती : चुलत सासऱ्याने सुनेवर बलात्कार केल्याची घटना आसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ ऑगस्ट रोजी उघड झाली. ८ ऑगस्ट रोजी घडलेल्या त्या प्रकरणी आसेगाव पोलिसांनी १६ ऑगस्ट रोजी भातकुली तालुक्यातील सुभाष नामक ३९ वर्षीय आरोपीविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

८ ऑगस्ट रोजी सकाळी २० वर्षीय विवाहित व तिचे आजेससरे हे दोघेच घरी असताना आरोपी चुलतसासरा तिच्या घरी पोहोचला. घरी कुणीच नाही का, अशी विचारणा केली. त्यावर आजेसासरे आहेत, बाकी सर्वजण शेतात गेले, असे ती उत्तरली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर दोनदा अतिप्रसंग केला. वाच्यता केल्यास तिला व तिच्या सासऱ्यांना मारून टाकण्याची धमकी देण्यात आली. तेवढ्यात पिडिताचा पती आल्याने आरोपी तेथून निघून गेला.

दरम्यान, कालपरवा आरोपी पुन्हा पिडिताच्या घरी तिच्यावर बलात्कार करण्याच्या उद्देशाने आला. मात्र तिच्या पतीला पाहून पळून गेला. अखेर तिने आसेगाव पोलीस ठामे गाठले. तथा तक्रार नोंदविली.

Web Title: Seeing that no one is at home, cousin father-in-law rapes daughter-in-law