शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
13
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
14
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
15
‘डोंट यू अंडरस्टँड? गेट आउट फ्रॉम हिअर!’ रस्ता मोकळा करा! ‘जेन-झी’ने हातात घेतलेले नवे शस्त्र
16
‘अमेरिकन ड्रीम’चा पोपट मेला असे म्हणायचे का?; भारताला बसणार सर्वाधिक फटका, कारण...
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या निकालावर विद्वत परिषदेची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:01 IST

राज्य शासनाने अंतिम सत्र, अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता अन्य सत्रातील विद्यार्थ्यांना निकाल जाहीर करावे, असा निर्णय घेतला होता. मात्र, हे निकाल कसे जाहीर करावे, गुणदान करण्याची प्रक्रिया, महाविद्यालयांची जबाबदारी आदी विषय स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, परीक्षा विभागाने विद्वत परिषदेच्या मान्यतेसाठी हा मुद्दा ठेवण्यापूर्वी निकाल जाहीर करण्याबाबतचे निकष, सूत्र निश्चित केले. यात विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली.

ठळक मुद्देपरीक्षा विभागाचे सूत्र मान्य : अंतिम सत्र वगळून दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार गुणदान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंतिम सत्र वगळता इतर सत्रांचे निकाल जाहीर करण्याविषयी गुरुवारी विद्वत परिषदेची मोहोर उमटली. त्यामुळे आता दीड लाख विद्यार्थ्यांना गुणदान होणार असून, परीक्षाविना पुढील वर्गात त्यांना प्रवेश घेता येतील. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने निकालाबाबत ठरविलेले सूत्र विद्वत परिषदेने मंजूर केले आहे. यादरम्यान निकालात काही बदल करण्याचे अधिकार कुलगुरुंना बहाल करण्यात आले आहे.राज्य शासनाने अंतिम सत्र, अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता अन्य सत्रातील विद्यार्थ्यांना निकाल जाहीर करावे, असा निर्णय घेतला होता. मात्र, हे निकाल कसे जाहीर करावे, गुणदान करण्याची प्रक्रिया, महाविद्यालयांची जबाबदारी आदी विषय स्पष्ट झाले नव्हते.दरम्यान, परीक्षा विभागाने विद्वत परिषदेच्या मान्यतेसाठी हा मुद्दा ठेवण्यापूर्वी निकाल जाहीर करण्याबाबतचे निकष, सूत्र निश्चित केले. यात विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. त्याअनुषंगाने गुरुवारी विद्वत परिषदेच्या आॅनलाईन बैठकीत परीक्षा विभागाने तयार केलेल्या निकालाबाबतची नियमावली, सूत्रांवर सदस्यांनी चर्चा केली. त्यानंतर निकाल तयार करण्याच्या कार्यप्रणालीवर विद्वत परिषदेने मोहोर उमटवली.अशी असेल नवी कार्यप्रणालीपरीक्षांच्या अभ्यासक्रमिकेत ज्या परीक्षांना सर्व विषयांना अंतर्गत गुण असतील आणि मागील सत्राची या अगोदर परीक्षा झालेली असेल, अशा परीक्षेच्या लेखी, प्रात्यक्षिक, प्रक ल्प परीक्षांना गुणदान करण्यात येतील. परीक्षेत काही विषयांना अंतर्गत सत्र गुण असतील, तर काही विषयांना अंतर्गत सत्र गुण नसतील. मागील लगतच्या सत्राची या अगोदर परीक्षा झाली आहे, अशा परीक्षांना लेखी, प्रात्यक्षिक, प्रकल्प परीक्षांचे गुण दिले जाणार आहे. अंतर्गत सत्र गुणांच्या टक्केवारीप्रमाणे लेखी गुण मिळतील. गुणपत्रिकेवर कोविड असा कोणताही उल्लेख असणार नाही, असा निर्णय झाला.विद्वत परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत दीड लाख विद्यार्थ्यांना गुणदान मिळणार आहे. अंतिम सत्र परीक्षाविना गुणपत्रिका दिली जाणार असून, पुढील वर्षात प्रवेश दिला जाणार आहे.- हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यांकन.

टॅग्स :universityविद्यापीठ