शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षा होणार एप्रिलमध्ये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:12 IST

अमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी व आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षा यांना ऑनलाइन होणार की, ऑफलाइन याबाबत अद्याप ...

अमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी व आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षा यांना ऑनलाइन होणार की, ऑफलाइन याबाबत अद्याप संभ्रम असला तरी एप्रिल महिन्याच्या अखेरीस या परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे. या परीक्षेसंदर्भात शिक्षण विभागाकडून माहिती सादर करण्याचे निर्देश राज्याच्या शिक्षण विभागाने दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून शिष्यवृत्ती परीक्षा होणार की नाही, याबाबत पालक आणि विद्यार्थी वर्गात तर्कविर्तक लावले जात आहे. काेरोनामुळे पाचवी ते आठवी वर्ग अद्याप सुरू झालेले नाहीत. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या वर्गात विद्यार्थी आणि पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला भीतीपोटी अल्प प्रमाणात विद्यार्थी शाळेत येत होते. आता मात्र संख्या वाढली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी सन २०२०-२१ फेब्रुवारीच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या रविवारऐवजी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याची तयारी वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. परीक्षा परिषदेमार्फत यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी मार्च-एप्रिलमध्ये शाळास्तरावर शिष्यवृत्ती परीक्षांसाठी विद्यार्थी निवडीकरिता मुहूर्त साधला जाणार आहे.

कोट

शिष्यवृत्ती परीक्षा नेमकी ऑनलाईन की, ऑफलाईन याबाबत वरिष्ठ स्तरावरून कुठल्याही सुचना नाहीत. मात्र, परीक्षेच्या अनुषंगाने आवश्यक माहिती वरिष्ठ कार्यालयाने मागविली आहे. त्यानुसार ही माहिती सादर केली जाईल.

- ई.झेड खान,

शिक्षणाधिकारी प्राथमिक