शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, १२ हजारांत शौचालय बांधावं कसं ?

By admin | Updated: November 8, 2014 22:31 IST

राज्याच्या पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबासाठी वैयक्तिक शौचालय, नळ योजनेची मुहूर्तमेढ रोवली. ही योजना राबविण्यासाठी महापालिकेने

व्यथा : शासनाचा अफलातून निर्णय, लाभार्थी योजनेपासून वंचितअमरावती : राज्याच्या पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबासाठी वैयक्तिक शौचालय, नळ योजनेची मुहूर्तमेढ रोवली. ही योजना राबविण्यासाठी महापालिकेने प्रस्तावदेखील मागविले. मात्र, वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी केवळ १२ हजार रुपये मिळत असल्याने महागाईच्या काळात एवढ्या तोकड्या रक्कमेत शौचालय बांधावे कसे? असा सवाल लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मोठ्या गाजावाजात सुरु करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ मिळू नये, अशी शक्कल शासनाने लढविल्यामुळे प्रचंड रोष पहावयास मिळत आहे.वाशीम जिल्ह्यातील सायखेडा येथील संगीता अव्हाळे या विवाहित महिलेने चक्क मंगळसूत्र विकून शौचालय बांधले. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक स्वच्छता जपण्याचा संदेश दिला. यापूर्वी शौचालय बांधण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम योजना, यशवंत पंचायत राज अभियान अशा विविधांगी योजना राबवून ग्रामीण भागातील जनतेला स्वच्छतेचा संदेश देत अंमलबजावणी करण्यात आली. तरीदेखील रस्त्याच्या कडेला बसून उघड्यावर शौचास बसणे ही शहर व ग्रामीण भागात नित्याचीच बाब झाली आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने शौचालय बांधणे कठीण झाले आहे. मात्र राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटंबांसाठी सुरु केलेली वैयक्तिक शौचालय योजना व नळ योजना ही तोकड्या अनुदानामुळे लाभार्थ्यांच्या भावनेशी खेळ चालविल्याचा आरोप नगरसेवक प्रदीप दंदे यांनी केला आहे. महागाईच्या काळात १२ हजार रुपयांत शौचालय कोण बांधून देईल, असा प्रश्न दंदे यांचा आहे. अमरावती महापालिकेत या योजनेसाठी १८ कोटी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. वैयक्तिक शौचालय व नळ योजनेसाठी १२ हजार ५२ लाभार्थी निश्चित करण्यात आले. मात्र बांधकाम साहित्याचे भाव गगणाला भिडल्याने १२ हजार रुपयांच्या अनुदानातून केवळ एक ट्रक वाळूच होते; उर्वरित शौचालयाच्या बांधकामासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील महिलेने मंगळसूत्र विकावे काय? असा सवाल नगरसेवक दंदे यांनी केला आहे. आघाडी शासनाने मोठा गाजावाजा करुन वैयक्तिक शौचालय, नळ योजना राबविण्याचा निर्णय घेतला. अनुसूचित जातीच्या समुदायाला मोठी स्वप्ने दाखवून ती स्वप्ने केवळ स्वप्नेच ठरावीत, अशी अफलातून राजकीय खेळी खेळल्याचा आरोप नगरसेवक प्रदीप दंदे, भूषण बनसोड, अजय गोंडाणे, दीपमाला मोहोड, प्रकाश बनसोड आदींनी केला आहे. अभियंत्यांनी खड्ड्याचा अहवाल, शौचालय बांधकामास जागा ‘ओके’ केली की, त्यानंतर ७ हजार ८०० रुपयांच्या धनादेशाचा दुसरा टप्पा प्रदान केला जातो. (प्रतिनिधी)