संजनाचा संपविणारा सोहम रूग्णालयातून थेट पोलीस कोठडीत

By प्रदीप भाकरे | Published: May 12, 2023 06:23 PM2023-05-12T18:23:04+5:302023-05-12T18:23:25+5:30

Amravati News ब्रेकअपवर ठाम असलेल्या संजनाचा गळा कापून तिची निर्घूणपणे हत्या करणाऱ्या सोहम ढाले याचा रूग्णालयातील मुक्काम संपताच त्याची रवानगी बडनेरा पोलिसांच्या हवालातीत झाली आहे.

Sanjana's exterminator Soham straight from the hospital to the police custody | संजनाचा संपविणारा सोहम रूग्णालयातून थेट पोलीस कोठडीत

संजनाचा संपविणारा सोहम रूग्णालयातून थेट पोलीस कोठडीत

googlenewsNext

अमरावती : ब्रेकअपवर ठाम असलेल्या संजनाचा गळा कापून तिची निर्घूणपणे हत्या करणाऱ्या सोहम ढाले याचा रूग्णालयातील मुक्काम संपताच त्याची रवानगी बडनेरा पोलिसांच्या हवालातीत झाली आहे. सोहमला १२ मे रोजी दुपारी २ वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच बडनेरा पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, संजनाच्या कुटुंबियांचा संताप पाहता, सोहमला जिल्हा रूग्णालयात ज्या वार्डमध्ये ठेवण्यात आले होते, तेथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. शुक्रवारी दुपारी डॉक्टरांनी पुन्हा एकदा सोहमला तपासून तो ओके असल्याचे सर्टिफिकेट बडनेरा पोलिसांनी दिली. अन् त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारीच त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने याआधीच संजनाच्या खुनाची कबुली दिली असून, रक्तरंजित कटर देखील आधीच जप्त करण्यात आले आहे.
 

म्हणून केली हत्या
एक वर्षाच्या प्रेमप्रकरणानंतर ब्रेकअप करण्यावर ठाम राहत यापुढे त्रास दिल्यास कुटुंबीयांसह प्राध्यापकांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्याने संजनाची हत्या केल्याची कबुली सोहम गणेश ढाले (१९) याने दिली. संजना शरद वानखडे (१९) व सोहम हे बडनेरा परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती व तंत्रज्ञान शाखेत प्रथम वर्षाचे क्लासमेट होते. एक वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोहमच्या त्रासाला कंटाळलेली संजना त्याच्यासोबत ब्रेकअप करणार होती. त्यावरच चर्चा करण्यासाठी ९ मे रोजी सायंकाळी दोघेही भेटले.


१० मे रोजी सकाळी संजना मृतावस्थेत तर सोहम जखमी अवस्थेत वडुरा शिवारातील नाल्यात आढळून आले होते. काही तासानंतर तपासात सोहमनेच संजनाचा खून करून स्वत:ला जखमी करून घेतल्याचे समोर आल्यावर त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संजनाची हत्या केल्याची कबुली दिल्याने पोलीस सोहमला अटक करण्यासाठी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची वाट पाहत होते. शुक्रवारी दुपारी सोहमला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली.


रुममेट, क्लासमेट्सचे बयाण नोंदविले

बडनेरा पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत संजना व सोहमचे रुममेट, क्लासमेट्स अशा सहा जणांचे बयान नोंदविले आहे. या प्रकरणात दोघांच्या आणखी काही कॉमन फ्रेण्ड्सचे बयान नोंदविण्यात येणार आहे, अशी माहिती बडनेराचे ठाणेदार नितीन मगर यांनी दिली. दरम्यान, गुरूवारी सायंकाळी संजनाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Sanjana's exterminator Soham straight from the hospital to the police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.