देवगाव चौफुलीवरून रेती, ट्रॉली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST2021-02-06T04:21:20+5:302021-02-06T04:21:20+5:30

तळेगाव दशासर पोलीस ठाण्यातील हवालदार गुलाबराव सांगळे यांनी एमएच २७ एल ९५३२ या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरच्या चालकास थांबवून रॉयल्टीबाबत ...

Sand, trolley seized from Devgaon Chowfuli | देवगाव चौफुलीवरून रेती, ट्रॉली जप्त

देवगाव चौफुलीवरून रेती, ट्रॉली जप्त

तळेगाव दशासर पोलीस ठाण्यातील हवालदार गुलाबराव सांगळे यांनी एमएच २७ एल ९५३२ या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरच्या चालकास थांबवून रॉयल्टीबाबत विचारणा केली. तेवढ्यात तेथे रोशन थोटे व आशिष कारमोरे हे एमएच २७ बीएच ७७६५ या दुचाकीने आले. आमच्याकडे ट्रॅक्टर वा रेतीच्या रॉयल्टीचे कुठलेही कागदपत्र नाहीत, असे बोलून सांगळे यांच्याशी हुज्जत घातली. दोघेही तेथून पळून गेले. त्यानंतर सांगळे यांनी २.५० लाख रुपयांचा ट्रॅक्टर, १२ हजार रुपयांची रेती, तथा १.५० लाख रुपये किमतीची दुचाकी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केली. सांगळे यांच्या तक्रारीवरून तळेगाव पोलिसांनी संतोष कन्नाके (३२), आशिष कारमोरे (दोन्ही रा. तळेगाव) व रोशन थोटे (रा. सरूर, जि. यवतमाळ) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

Web Title: Sand, trolley seized from Devgaon Chowfuli