मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून सालई गोंद तस्करी; एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 14:12 IST2022-04-26T14:45:27+5:302022-04-27T14:12:15+5:30
मेळघाटातील घनदाट जंगलात अनेक सालई वृक्ष आहेत. त्या वृक्षांचा गोंद काढून त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी व विक्री केली जाते.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून सालई गोंद तस्करी; एकाला अटक
परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या अंबाबारवा अभयारण्यामध्ये अवैधरीत्या सालई गोंद वाहतूक करून व्याघ्र आधिकारी दिसताच वाहन टाकून पळून गेलेल्या असताना एका तस्कर आला मोठा शिताफीने शुक्रवारी अटक करण्यात आली. मेळघाटातून मोठ्या प्रमाणात गोंद तस्करी होत असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे.
शेख अनिस शेख मुसा रा. जमोद ता जळगाव जामोद जि. बुलडाणा असे चाललय गोंधळ तस्करी करणाऱ्याचे नाव आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून वनकर्मचारी यांना करमोडा ते धामनगाव गोतमारे रस्त्यावर एक महिन्यापासून सतत पाळत ठेवली होती. अवैधरीत्या सालई गोद वाहतुकप्रकरणी सालई गोंद २९ कट्टे ८७० किलो गोंद व वाहन जप्त करण्यात आले होते. परंतु सदर वाहन चालक हा वाहन सोडून पळून गेला होता. अज्ञात आरोपीविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला होता. मेळघाटातील घनदाट जंगलात अनेक सालई वृक्ष आहेत. त्या वृक्षांचा गोंद काढून त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी व विक्री केली जाते.
राखीव क्षेत्रातून तस्करीची कबुली
गोपनिय माहीतीच्या आधारे नामे शेख अनिस शेख मुसा रा. जमोद यास २२ एप्रिल रोजी ताब्यात घेवून चौकशी केली असता आरोपीने राखीव वनरक्षेत्र करमोडा मधुन अवैधरीत्या गोंद गोळा करून वाहतुक केली असल्याची कबुली दिली इतरही गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती आहे त्यामुळे मेळघाटच्या जंगलातून सालई गोंदाची तस्करि पुन्हा उघड झाली आहे