शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा

By admin | Updated: November 18, 2015 00:28 IST

तालुक्यातील आदिवासी भागाचा विकास व्हावा याकरिता कोट्यवधी रुपयांचे रस्त्यासाठी व इतर अनेक योजनांतून निधी खेचून आणला.

निकृष्ट दर्जाचे काम : कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी वरूड : तालुक्यातील आदिवासी भागाचा विकास व्हावा याकरिता कोट्यवधी रुपयांचे रस्त्यासाठी व इतर अनेक योजनांतून निधी खेचून आणला. परंतु संबंधित ठेकेदारांनी आदिवासी भागामध्ये केलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने संपूर्ण रस्ते उखडले आहेत. जागोजागी खड्डे पडले आहेत. घरकुलाच्या इमारतींना भेगा पडल्या असून कोसळण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अशा ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे.सातपुडा पर्वताच्या कुशीत अनेक खेडे वजा गावे आहेत. या परिसरात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. आदिवासीबहुल भागातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा व्हावी तसेच तालुक्यातील खेडे शहरासोबत जोडण्याकरिता ग्रामीण रस्ते मुख्य रस्त्यासोबत जोडली गेली. याकरिता प्रधामंत्री ग्रामसडक योजना, ठक्कर बाप्पा योजना तर नाबार्ड तसेच विविध योजनांतून मोठमोठे रस्ते बांधण्यात आले. परंतु रस्ते बांधताना ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केले. यामुळे एकाच वर्षाच्या आत रस्त्याची दुर्दशा होऊन बांधकाम विभागाचे वाभाडे काढले. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधीचा दुरुपयोग झाला. रस्ते बांधकामात अंदाजपत्रकाप्रमाणे साहित्य वापरण्यात आले नसल्याने गिट्टी, डांबर दिसतच नसल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराकडे शाळेत येताना सुविधा मिळावी हा यामागचा उद्देश होता. परंतु मुख्य विषयालाच तिलांजली मिळाली आहे. परंतु रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहनेसुध्दा रस्त्यावरून धाऊ शकत नसल्याने आदिवासी ग्रामस्थांना पायदळी यावे लागते. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मुलांना पायदळी यावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असतो. आदिवासी भागाचा विकास व्हावा यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी विकास कामासाठी दिला. परंतु संबंधित ठेकेदाराने अधिकाऱ्यासोबत संगनमत करून संबंधित कामे अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे केल्याने संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. शासनाने ठरविलेल्या अंदाजपत्रकानुसार कामे झाली नसून त्या कामावरील असलेला निधी ठेकेदार व अधिकाऱ्यांनी घशात घातला आहे. शासकीय निधीतून रस्ते किंवा कोणतेही विकासकामे करताना निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी बांधवांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)