शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

कारागृहात स्वातंत्र्य संग्राम लढ्याच्या स्मृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 1:32 AM

गुरुवारी भारताचा ७२ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र, हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांना बलिदान द्यावे लागले. स्वातंत्र्य संग्राम लढ्यातून हे स्वप्न साकार झाले आहे. स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी कारावास भोगला, त्यांच्या आठवणी, स्मृती आजही भारतीयांच्या मनावर कोरल्या आहेत.

ठळक मुद्दे१९३० ते १९४४ दरम्यान कैद

व्ही.व्ही. गिरी, नीलम संजीव रेड्डी यांनाही कारावासगणेश वासनिक ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गुरुवारी भारताचा ७२ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र, हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांना बलिदान द्यावे लागले. स्वातंत्र्य संग्राम लढ्यातून हे स्वप्न साकार झाले आहे. स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी कारावास भोगला, त्यांच्या आठवणी, स्मृती आजही भारतीयांच्या मनावर कोरल्या आहेत.अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात १९३० ते १९४४ या काळात ५१ स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी कारावास भोगला. यात माजी राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी, नीलम संजीव रेड्डी, शिवाजीराव पटवर्धन यांचाही समावेश होता.ब्रिटिशांच्या जोखडातून देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्वधर्मीयांनी लढा दिला. ९ आॅगस्ट १९४२ च्या ‘चलो जाव’च्या संदेशानंतर स्वातंत्र्यलढ्याचे रान पेटले. देशवासी रस्त्यावर उतरले. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींना ब्रिटिश शासनकर्त्यांनी तुरुंगात डांबले. ज्या तुरुंगात त्यांना कारावास भोगावा लागला, तेथील बराकीत आजही भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला उजाळा देतात. येथील मध्यवर्ती कारागृहात एक-दोन नव्हे, तर तब्बल ५१ जणांना कारावास झाला होता. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींचे जतन, संरक्षण कारागृह प्रशासन आजही करते. स्वातंत्र्य दिन, शहीद दिन आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या स्मृतिस्थळाचे पूजाअर्चा करुन स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले जाते. १५ आॅगस्ट रोजी त्याअनुषंगाने कारागृह प्रशासनाने तयारी चालविली आहे.७२ वर्षांपासून ‘त्या’ बराकी रिकाम्याचयेथील मध्यवर्ती कारागृहात १९३० ते १९४४ या कालावधीत ५१ स्वातंत्र्य संग्राम सेनानींना कारावास झाला होता. त्यावेळी दोन बराकीत स्वातंत्र्य सेनानींना ठेवण्यात आले होते. १५ आॅगस्ट १९४७ रोजी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आजतागायत या दोन्ही बराकीत एकही बंदीजन ठेवण्यात आला नाही. या बराकी आजही स्वातंत्र्य संग्राम लढ्याच्या स्मृती म्हणून रिकाम्या ठेवल्या जातात.या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी भोगला कारावासएम. पल्लम राजू, के.आर. कारंथ, के.पी. अग्नेश्वरिया, सी.एन.एम. मुदलियार, आर. नायडू, एम. अप्पलस्वामी, पी. गणपथीराव, के. कलेस्वामी राव, आर.सी. भारती, सी. चट्टेयार, के.के. रेड्डी, एम.बी. नायडू, एम. अनंतशय्यानम अय्यंगार, के. कलप्पा, के.ए. दामोदर मेनन, ए. कुप्परस्वामी मुदलियार, ए. पिल्लाई, एस.एस. कुलकर्णी, व्ही.व्ही.गिरी, नीलम संजीव रेड्डी, एस. सत्यमूर्ती, के. कामराज, एम.भक्तवत्सलम्, आर. राघवमेनन, व्ही. राघवैया, टी. विश्वनाथन, कला व्यंकटराव, पी. सीवरनानन, लक्ष्मीनारायण मालाणी, सीताराम जाजू, पार्वतीबाई पटवर्धन, रघुनाथमल कोचर, वीर वामनराव जोशी, पी.बी. सदातपुरे, कांताबेन रतनलाल, रतनलाल बापूजी जैन, पंडित द्वारकाप्रसाद मिश्र, एम.व्ही. अभ्यंकर, शिवाजी पटवर्धन, संभाजी गोखले, पु.का. देशमुख, दिनकर कानडेशास्त्री, डी.बी. सोमण, जी.जी. भोजराज, जी.बी. खेडकर, नीळकंठ मुरारी घटवाईस्वातंत्र्य संग्राम लढ्याच्या स्मृतिस्थळाचे गतवर्षी नूतनीकरण करण्यात आले. दरवर्षी दिन, औचत्य साधून येथे पूजाअर्चा करून स्मृती जागविल्या जातात. या बराकी स्वातंत्र्य लढ्यानिमित्त आजही ‘जैसे थे’ आहेत.- रमेश कांबळेअधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन